Marathi News> भारत
Advertisement

आता whatsaap वर मिळवा कोरोना Vaccination Certificate, कसं ते पाहा

आता तुम्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे प्रमाणपत्र मिळवू शकता.

आता whatsaap वर मिळवा कोरोना Vaccination Certificate, कसं ते पाहा

मुंबई : देशात कोरोना व्हायरस अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही, देशातील अनेक भागांमधून कोरानाची नवीन नवीन प्रकरणे समोर येऊ लागली आहेत आणि या प्राणघातक साथीला सामोरे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण. COVID-19 विरुद्ध लसीकरण, हे लोकांना या व्हायरसपासून बचाव करण्याचे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही अद्याप लस घेतली नसल्यास, तुम्ही ती लगेच जवळील लसीकरण केंद्रातून घ्या.

तसेच तुम्ही कोविड -19 लसीचा एक डोस किंवा दोन्ही डोस घेतले असल्यास, तुम्ही शक्य तितक्या लवकर प्रमाणपत्र डाउनलोड करावे. प्रमाणपत्र तुम्हाला आरटी पीसीआर चाचणी न घेता बहुतेक राज्यांमध्ये मुक्तपणे प्रवास करू देईल, जर तुम्ही पूर्णपणे लसीकरण केले असेल, तर तुम्हाला पीव्हीआर सिनेमासारख्या ठिकाणी मोफत भेटवस्तू मिळू शकतात. तथापि, हे सर्व तेव्हाच केले जाऊ शकते, जेव्हा आपण आपले लसीकरण प्रमाणपत्र यशस्वीरित्या सादर करण्यास सक्षम असाल.

त्याचप्रमाणे आता कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्यो लोकांना लोकलं ने प्रवास करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ज्यामुळे दोन डोस घेतलेल्या लोकांना त्यांच्या जवळ त्यांचे प्रमाणपत्र बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे आता तुम्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे प्रमाणपत्र मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे हे सांगणार आहोत.

भारत सरकारने कोविडशी संबंधित संसाधने असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुरू केले. पण आता तुम्ही तुमचे Vaccination प्रमाणपत्र देखील यावरुन डाउनलोड करू शकता.

MyGov कोरोना हेल्पडेस्क whatsapp क्रमांक +91 9013151515 आहे. हा नंबर सेव्ह करा

व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि सर्च बारवर तुम्ही तुमच्या फोनवर सेव्ह केलेला नंबर शोधा.

MyGov संपर्क सापडल्यावर चॅट विंडो उघडा

जेव्हा आपण चॅट उघडाल, तेव्हा चॅट बॉक्समध्ये, डाउनलोड प्रमाणपत्र टाइप करा.

जेव्हा तुम्ही हे टाइप करता तेव्हा WhatsApp तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी OTP पाठवेल. आपण CoWin अर्जावर COVID-19 लसीसाठी नोंदणी केलेल्या नंबरवरून संदेश पाठविल्यास हे आपल्यासाठी सोयीचे असेल.

MyGov च्या WhatsApp चॅट बॉक्समध्ये हा OTP टाईप करा.

जर तुम्ही एकापेक्षा जास्त वापरकर्त्यांची नोंदणी केली असेल, तर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला लोकांची यादी पाठवेल आणि तुम्हाला एक निवडण्यास सांगेल.

तुम्ही नोंदणी केलेल्या लोकांच्या संख्येवर अवलंबून तुम्हाला एक, दोन किंवा तीन असे पर्याय दिले जातील. ज्या क्रमांकासाठी तुम्हाला प्रमाणपत्र हवे आहे ते टाइप करा.

त्यानंतर चॅटबॉक्स तुम्हाला COVID-19 लसीकरण प्रमाणपत्र पाठवेल. आपण ते आपल्या फोनवर डाउनलोड करू शकता.

Read More