Marathi News> भारत
Advertisement

IAS Tina Dabi ला असं केलं होतं प्रपोज, किस्सा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल...

IAS Tina Dabi News: आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) यांची आयएएस प्रदीप गावंडे (IAS Pradeep Gawande) यांच्याशी कशी भेट झाली आणि त्यांचे पती प्रदीप गावंडे यांनी तिला कसे प्रपोज केले?

IAS Tina Dabi ला असं केलं होतं प्रपोज, किस्सा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल...

IAS Tina Dabi News: आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) नेहमीच चर्चेत असते आणि दररोज ती तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांसह तिचे फोटो शेअर करत असते, जे काही मिनिटांतच व्हायरल होतात. टीना डाबीने आयएएस प्रदीप गावंडे (IAS Pradeep Gawande) यांच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की टीना डाबी यांची IAS प्रदीप गावंडे यांच्याशी कशी भेट झाली आणि त्यांचे पती प्रदीप गावंडे यांनी तिला कसे प्रपोज केले?

टीना डाबीचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही म्हणून तिने तिचा पहिला पती अतहर आमिर खानपासून (IAS Athar Aamir Khan) घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर टीनाने आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, टीना डाबी आणि तिचे पती आयएएस प्रदीप गावंडे यांची पहिली भेट ऑफलाइन होती.

आयएएस टीना डाबी यांची कामादरम्यान भेट झाली

टीना डाबी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होते की, 'प्रदीप गावंडे यांच्याशी तिची भेट आरोग्य विभागातील काही कामादरम्यान झाली होती. याआधी आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती आणि लग्नाआधी आम्ही अनेकदा भेटलो होतो. त्यानंतर आमची एकमेकांच्या कुटुंबाशी ओळख झाली आणि आम्ही वर्षभर भेटलो. त्यानंतर काही महिन्यांनी प्रदीप गावंडेने तिला प्रपोज केलं. यानंतर दोघांनीही खूप विचार करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.'

आयएएस टीना डाबी ही 2015 ची UPSC टॉपर आहे. तिने 2018 मध्ये अतहर आमिर खानसोबत लग्न केलं. त्याचवेळी, दोघांच नातं फार काळ न टिकल्यामुळे, दोघांनी 2020 मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांनी इन्स्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट (Instagram Account Deactivate) केलं होतं.

Read More