Marathi News> भारत
Advertisement

आज 12 वाजता फ्लिपकार्टवर Honor 20i चा सेल, जाणून घ्या फिचर्स

ऑफलाइन स्टोरमध्ये हा स्मार्टफोन 16 हजार 999 रुपयांना विक्रीस आहे. 

आज 12 वाजता फ्लिपकार्टवर Honor 20i चा सेल, जाणून घ्या फिचर्स

नवी दिल्ली : चायनीज स्मार्टफोन मेकर हुआवेने (Huawei)11 जूनला भारतीय बाजारपेठेत हॉनर 20 सीरीज स्मार्टफोन लॉन्च केला. या सीरीजचे तीन स्मार्टफोन Honor 20, Honor 20 Pro, Honor 20i लॉंच करण्यात आले. Honor 20i हा एक मिड रेंज स्मार्टफोन आहे. याचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार आहे. ऑफलाइन स्टोरमध्ये हा स्मार्टफोन 16 हजार 999 रुपयांना विक्रीस आहे. तर आजच्या या सेलमध्ये 2 हजार रुपयांची सूट मिळत आहे. 

या स्मार्टफोनमध्ये 24MP+8MP+2MP चा ट्रीपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याला 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी आहे. याला 6.21 इंचाचा फुल डिस्प्ले असून Kirin 710 chipset प्रोसेसर आहे. याची बॅटरी 3400 mAh ची आहे. सफायर ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि आइसलॅंडीक व्हाईट अशा रंगांमध्ये हा उपलब्ध आहे. 

या स्मार्टफोनसोबत लॉंच झालेल्या इतर दोन स्मार्टफोन हॉनर 20 प्रो आणि हॉनर 20 मध्ये चार रियर कॅमेरा सेटअप दिले गेले आहेत.  हॉनर 20 प्रोची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. याला 6.26 इंचाचा फुल डिस्प्ले आहे. याचे रिझॉलुशन 2340×1080 पिक्सल आहे. तर याला पंच होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हॉनर 20 प्रोमध्ये 48MP+16MP+8MP+2MP चे चार रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत. 

Read More