Marathi News> भारत
Advertisement

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi Puranpoli Recipe : कणीक ताटावर एक फुटावर धरुन हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटार्पयत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

Holi 2023 :  Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi 2023 : होळी रे होळी, पुरणाची पोळी…असं म्हणत पुराणपोळीवर ताव मारून आपण होळी सणाचा (Holi 2023) आनंद लुटतो. होळी सण अवघ्या काहीच दिवसांवर आला आहे , आतापर्यंत गृहिणींनी किरणाच्या यादीत पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची यादी एव्हाना करून ठेवली असेल. 

होळी म्हटलं की सर्वात आधी येते ती पुरणाची पोळी. गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार अहाहा!  आताच तोंडाला पाणी सुटलं ना ? 

fallbacks

पण आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी असतील ज्यांचा पुरणपोळीचा बेत फसतो. आणि मग सगळं हिरमोड होऊन जातो. पण या होळीला असं होऊन चालणार नाही. होळी हा आनंदाचा सण आहे याची सुरवात गोडव्यानेच करायची. या वेळी पुरणपोळीचा  (Puranpoli recipe in marathi ) बेत फसणार नाही, याची जबाबदारी आमची ! चला तर मग एकदम परफेक्ट खुसखुशीत मऊसूत आणि खमंग पुरणपोळी कशी बनवायची त्यासाठीच्या काही खास टिप्स जाणून घेऊया. (Holi 2023 5 tips top make soft purnapoli for holi cooking tips in marathi)
     
जर कोणी  पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असेल तर अनेक प्रश्न डोक्यात सुरु होतात. ते म्हणजे  पूर्ण पोळी नीट साधेल की नाही ? पुरण व्यवस्थित बनलं जाईल का ? सारण बाहेर तर येणार नाही ना असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. शिवाय, पुरणपोळीचा बेत म्हणजे वेळ खाऊ काम  असं अनेकींना वाटतं. पण तुम्हाला आज अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याने पटकन पुरणपोळीचा बेत जमूनसुद्धा येईल आणि पुरणपोळी उत्तम साधेल.  (Holi Special Puran Poli Recipe)

पुरणपोळी मुख्यतः महाराष्ट्रात बनवला जाणारा पदार्थ. पण प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. पद्धत कितीही वेगळी असली तरी, तोंडात टाकल्या बरोबर विरघळली पाहिजे अशीच पुरणपोळी असायला हवी हे मात्र नक्की.   

पुराणपोळीसाठीचं साहित्य

  • चणा डाळ- 1 कप 
  • किसलेला गूळ- 1 कप 
  • मैदा - एक कप 
  • तेल- 7-8 टेबल स्पून 
  • वेलची पूड- 1 चमचा 
  • सुट्टा मैदा - पुरणपोळी लाटण्यासाठी    

पुरणपोळीसाठी सर्वात आधी बनवून घ्या पुरण 

  • एक कुकर घ्या त्यात चणा डाळ घाला व्यवस्थित धुवून घ्या, आता त्यात पाणी घाला; जितकी चणाडाळ आहे त्याच्या अडीचपट पाणी घ्या. आणि डाळ व्यवस्थित शिजवून घ्या. 
  • डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी वेगळं करून घ्या, हे पाणी फेकून देऊन नका. या पाण्यापासून कटाची आमटी करावी.
  • डाळीतील पाणी निथळुनघेतल्यावर  एका वेगळ्या भांड्यात ती डाळ काढून घ्या, त्यात किसलेला गूळ घाला . गुळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त असावं, पण पुरणपोळी शक्यतो गोड असते त्यामुळे जास्त गूळ घातला तरी हरकत नाही. 
  • आता हे मिश्रण मंद आचेवर चांगलं परतून घ्या. वरचेवर मिश्रण ढवळत राहा नाहीतर करपू शकते. हे मिश्रण सुरवातीला पाणी सोडेल आणि हळूहळू आणखी घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात एक चमचा वेलचीपूड घाला. 
  • मिश्रण घट्ट झाल्यावर ते गॅस बंद करा . मिश्रण थोडं गरम असेल तेव्हाच ते पुरण यंत्रातून काढून घ्या. कारण थंड झाल्यावर पुरण नीट बारीक होत नाही. 

अश्याप्रकारे पुरण तयार होईल. तयार पुरण एका भांड्यात झाकून ठेऊन द्या , आणि कणिक मळायला घ्या. 

टीप : पुरण बरोबर झाल्याचा निकष म्हणजे त्यामधे झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो. असं झालं की पुरण गॅसवरुन उतरवून गरम असतंनाच पुरणयंत्रातून वाटून घ्यावं.

  • एका भांडयात मैदा घेऊन त्यात 5-6 चमचे तेल, चिमूटभर मीठ ,हळद घाला. हे पीठ अतिशय सैलसर मळून घ्या. पुरणपोळी पोळपाटावर सरसर लाटण्यासाठी त्यासाठीची कणिक परफेक्ट व्हावी लागते. ((Holi 2023 5 tips top make soft purnapoli for holi cooking tips in marathi))
  • एकदा कणिक भिजवून साधारण अर्धा तास भिजवून ठेवावी, त्यानंतर तेलाचा हात घेऊन कणिक पुन्हा पुन्हा मळून घ्यावी. 
  • एक लक्षात ठेवा उत्तम पुरणपोळी हवी असेल तर तुम्हाला कणिक भरपूर मळावी लागणारं आहे. 
  • एकदा का कणिक परफेक्ट झाली कि, मग पुरणाचे गोळे करावेत.
  • कणकेची पातळ पारी बनवून त्यात पुरणाचा गोळा भरावा. आणि सर्व बाजूनी तो बंद करून घ्यावा. 

(video credit - hebbar's kitchen )

  • पोळपाटावर मैदा पसरवून हलक्या हातानी पोळी लाटून घ्यावी. 
  • तवा चांगला करून माध्यम आचेवर ठेऊन द्यावा , पोळी छान खरपूस भाजून घ्यावी, आणि साजूक तूप घालून मस्तपैकी गरमागरम सर्व्ह करावी. 

टीप : पुरणपोळी मंद किंवा मध्यम आचेवर भाजून घ्या, पोळी भाजल्यावर डब्यात न ठेवता एखाद्या पेपरवर आधी टाका. थंड झाल्यावर डब्ब्यात भरून ठेवा .

Read More