Marathi News> भारत
Advertisement

Hindenburg Report वर Adani Group ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "हा रिपोर्ट म्हणजे...."

Adani Group Hit Back on Hindenburg Report : हिंडेनबर्गचा (Hindenburg) रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपला मोठं नुकसान झालं आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान अदानी ग्रुपच्या CFO नी ही रिपोर्ट बनावट असल्याचं म्हटलं आहे.   

Hindenburg Report वर Adani Group ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

Adani Group on Hindenburg Report: अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या (Hindenburg) रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये (Adani Group Shares) मोठी घसरण झाली आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर लबाडी आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. दरम्यान हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर अदानी ग्रुपकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून सर्व आरोप निराधार आणि भ्रमिष्ट असल्याचं म्हटलं आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आरोप केला असून कॉपी-पेस्ट केल्याचं म्हटलं आहे. 

"चुकीच्या पद्धतीने रिपोर्ट मांडला"

अदानी ग्रुपचे मुख्य वित्त अधिकारी जुगशिंदर सिंग (CFO Jugeshinder Singh) यांनी हिंडेनबर्गच्या अहवालावर (Hindenburg Report) प्रतिक्रिया दिली आहे. अदानी समूहाला विचारण्यात आलेले प्रश्न चुकीच्या पद्धतीने का दर्शवण्यात आले अशी विचारणा हिंडेनबर्गला केली पाहिजे असं जुगशिंदर सिंग म्हणाले आहेत. 

हिंडेनबर्ग रिसर्चने दिलेला अहवाल हा भारत आणि भारतीय संस्थांवर केलेला पूर्वनियोजित हल्ला असून अहवालातील माहिती धांदात खोटी आहे, असा आरोप अदानी समूहाने केला आहे. अदानी समूहाने ४१३ पानांचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच हिंडेनबर्ग रिसर्चमध्ये विचारण्यात आलेल्या 88 प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

Gautam Adani यांनी दोन दिवसांत गमावली तब्बल इतकी संपत्ती; या पैशात Pakistan ने आठ महिने बसून खाल्लं असतं!

सिंग यांनी सांगितलं आहे की "सर्व 88 प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. आम्ही जे खुलासे केले आहेत त्याचाच त्यांनी आधार घेतला असून कोणतंही संशोधन केलेलं नाही. यामधील 68 प्रश्न बनावट आणि भ्रमिष्ट आहेत. त्यांनी कोणताही रिसर्च केलेला नाही. फक्त कट-कॉपी-पेस्ट केलं आहे. हा रिपोर्ट FPO ला नुकसान पोहोचवण्यासाठी होता. तुम्ही 68 प्रश्न चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर का सादर केलेत अशी विचारणा त्यांना केली पाहिजे".

"आम्ही असत्य स्वीकारु शकत नाही"

इतर 20 प्रश्नांबद्दल विचारण्यात आलं असता सिंग यांनी सांगितलं की, "अदानी समूह टीका स्वीकारत का नाही असे प्रश्न विचारले होते. पण तसं नाही, आम्ही टीका स्विकारतो. पण आम्ही असत्य स्वीकारत नाही. एखाद्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ शकत नाही".
 

अदानी चौथ्यावरुन थेट सातव्या क्रमांकावर

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून Adani Group मध्ये सामील सर्व कंपन्यांचे शेअर्स वारंवार घसरत आहेत. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. बिलेनियर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, अदानी ग्रुपच्या कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप (Adani Group Market Cap) फक्त सहा तासांच्या कामाकाजात 50 अरब डॉलर म्हणजेच 4 लाख कोटींपेक्षा कमी झालं आहे. याचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर झाला आहे. गौतम अदानीजगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून ते थेट सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या दोन दिवसांत 2.11 लाख कोटीची घसरण झाली आहे. 

Read More