Marathi News> भारत
Advertisement

Coronavirus: भारताची परिस्थिती आणखी बिकट; २४ तासांत कोरोनाचे ४९ हजार नवे रुग्ण

कोरोनामुळे देशातील ३०,६०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Coronavirus: भारताची परिस्थिती आणखी बिकट; २४ तासांत कोरोनाचे ४९ हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली:  देशात कोरोना व्हायरसचा Coronavirus प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे ४९, ३१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे भारत आता लवकरच दिवसाला ५० हजार रुग्ण सापडण्याचा टप्पा ओलांडू शकतो. ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. 

कोविड केअर सेंटरमध्ये असं काही घडतंय की....रुग्ण एकदम खुश

आतापर्यंत भारतात कोरोनाचे १२,८७९४५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४,४०, १३५ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ८,१७, २०९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे देशातील ३०,६०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे भारत अत्यंत बिकट परिस्थितीत सापडला आहे. 

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के, आतापर्यंत १.९४ लाख रुग्ण ठणठणीत

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९,८९५ नवे रुग्ण आढळून आले होते. परंतु, सुदैवाने महाराष्ट्रात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. कालच कोरोनातून बऱ्या झालेल्या ६४८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.०९ % एवढे झाले आहे. 

Read More