Marathi News> भारत
Advertisement

मराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून सुनावणी, वैद्यकीय प्रवेशाला तूर्त स्थगिती नाही

मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी २७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. ही सुनावणी तीन दिवस सुरु राहणार आहे.  

मराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून सुनावणी, वैद्यकीय प्रवेशाला तूर्त स्थगिती नाही

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी २७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. ही सुनावणी तीन दिवस सुरु राहणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होणार आहे. वैद्यकीय प्रवेशाला तूर्त स्थगिती देण्यास सर्वोच्च यालयाने नकार दिला आहे. आता पुढील २७ ते २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

 अंतिम सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाने सांगितले आहे. मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यांनी प्रथम म्हणणे मांडावे. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या बाजुने आपले म्हणणे मांडायचे आहे. त्यानंतर २९ तारखेला अंतिम सुनावणी होणार आहे, अशी माहिती विनोद पाटील यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यातच मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी घेणे शक्य नसल्याचे राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. यानंतर न्यायालयानं प्रत्यक्ष उपस्थित राहून सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केले. परंतु याच महिन्यात वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया करावी लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा मुद्दा असल्याने आज सुनावणी झाली. यावेळी वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती देण्यात आलेली नाही.

दोन दिवसांपूर्वीच सरकारने घेतलेल्या बैठकीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सहभागी झाले होते. त्यामुळे सिब्बल यांचा सारखा वकील देऊन आरक्षण संदर्भात बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी राज्य सरकारने हा खटला लढवण्यासाठी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती केली होती. यांच्या जोडीला आता कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील रफीक दादाही हा खटला लढवणार आहेत.

Read More