Marathi News> भारत
Advertisement

अयोध्या प्रकरणावर 6 ऑगस्टपासून सुनावणी

मध्यस्थता समिती एकमत करण्यात अपयशी

अयोध्या प्रकरणावर 6 ऑगस्टपासून सुनावणी

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार आहे. कोर्टाने म्हटलं की, मध्यस्थता समितीकडून काही निष्कर्ष नाही निघाला. मंदिर वादावर हिंदू आणि मुस्लीम पक्षामध्ये कोणतीच सहमती झाली नाही. दोन्ही पक्षामध्ये सहमती घेण्यासाठी मध्यस्थता समितीला 31 जुलैपर्यंत वेळ देण्य़ात आला होता. 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत निर्णय येणं अपेक्षित आहे.

अयोध्या प्रकरणावर सुनावणी करत असताना चीफ जस्टिस रंजन गोगोई यांनी म्हटलं की, आम्ही या प्रकरणात विविध मुद्द्यांवर विचार करु. आधी प्रकरणाची सुनावणी सुरु होऊ द्या. या वेळी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी देखील उपस्थित होते.

सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी करताना म्हटलं की, 'सगळ्या वकिलांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र तयार ठेवा. ज्याच्या आधारावर बाजू मांडण्य़ात येणार आहे.'

वकील विष्णु यांनी म्हटलं की, 'मध्यस्थता समिती एकाच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अपयशी ठरली. या प्रकरणात हिंदू पक्ष आपली बाजू मांडण्य़ाची तयारी करण्यासाठी 40 दिवसाची वेळ घेईल.'

सुप्रीम कोर्टाने 8 मार्चला 3 सदस्यांची समिती बनवली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एफएमआई खलीफुल्ला हे अध्यक्ष होते. श्रीश्री रविशंकर आणि वरिष्ठ अधिवक्ता श्रीराम पांचू हे या समितीत सदस्य होते.

Read More