Marathi News> भारत
Advertisement

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा, व्याजदरांमध्ये वाढ

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा होणारी बातमी आहे. 

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा, व्याजदरांमध्ये वाढ

मुंबई : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा होणारी बातमी आहे. बँकेनं एफडी (फिक्स डिपॉजिट) वरचे व्याजदर वाढवले आहेत. आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यानंतर एचडीएफसीनं हा निर्णय घेतला आहे. एफडीवर ६० बेसिस पॉईंट म्हणजेच ०.६० टक्के जास्त व्याज मिळणार आहे. बँकेनं ६ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंतच्या फिक्स डिपॉजिटवरचे व्याजदर वाढवले आहेत. ६ महिने ते ९ महिन्यांच्या फिक्स डिपॉजिटचे व्याजदर ०.४० टक्के वाढून ६.७५ टक्के झाले आहेत. पण ३ महिने किंवा त्यापेक्षा कमी महिन्यांच्या एफडीवरच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एक वर्षासाठीच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. 

एचडीएफसीचे व्याजदर

fallbacks

Read More