Marathi News> भारत
Advertisement

Gold Hallmarking Rule | आता शुद्ध सोने खरेदी विक्रीत तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी; सरकारचा जबरदस्त प्लॅन

सोने खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे (Gold Hallmarking Rules).

Gold Hallmarking Rule | आता शुद्ध सोने खरेदी विक्रीत तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी; सरकारचा जबरदस्त प्लॅन

नवी दिल्ली : सोने खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे (Gold Hallmarking Rules). सरकारने आता सोन्यापासून बनवलेल्या सर्व दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक केले आहे. वास्तविक, सोन्याच्या शुद्धतेबाबत होणाऱ्या फसवणूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे केले गेले आहे.  हॉलमार्किंग दागिन्यांच्या शुद्धतेची हमी देत असते.

सरकारने गेल्या वर्षी जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. आता ते वेगवेगळ्या टप्प्यात लागू केले जात आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 256 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क अनिवार्य करण्यात आले आहे. 

मंत्रालयाची माहिती 

हॉलमार्किंग हे एक गुणवत्ता प्रमाणपत्र आहे, जे सोन्याची शुद्धता दर्शवते. 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी हे अनिवार्य करण्यात आले आहे. या 256 जिल्ह्यांमध्ये किमान एक हॉलमार्किंग केंद्र आहे. 

हॉलमार्किंगचे नियम 

या नियमाच्या अंमलबजावणीनंतर, हॉलमार्किंग लागू झाल्यानंतर भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या जवळपास चौपट झाली आहे. देशात ऑटोमेशन सॉफ्टवेअर आणल्यानंतर, पाच महिन्यांत सुमारे 4.5 कोटी दागिने हॉलमार्क केले गेले आहेत.

Read More