Marathi News> भारत
Advertisement

हाफिजला टेरर फंडिंग प्रकरणात 73 लाखांची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

एफआयएफशी संबंधित टेरर फंडींग प्रकरणात 73 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

हाफिजला टेरर फंडिंग प्रकरणात 73 लाखांची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद आणि पाकिस्तान सुरु असलेली फलह-ए-इंसानियत संघटना (एफआयएफ) शी संबंधित टेरर फंडींग प्रकरणात 73 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने टेरर फंडींग विरोधात सुरू केलेल्या कारवाईत गेल्या पाच महिन्यात 212 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. तर याप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मनी लॉंड्रींग अॅक्ट अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

एफआयएफ विरोधात सुरू असलेल्या कारवाईत दिल्लीत मोहम्मद सलमानचा एक फ्लॅट, दुकान, कॅश आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे. एफआयएफ ही एक दहशतवादी संघटना आहे. ईडीने राष्ट्रीय शोध पथक (एनआयए) च्या एफआयआर नंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

याप्रकरणी एनआयएने आधी छापे मारले होते आणि चार डझनहून अधिक सिम कार्ड, फोन आणि 1.56 कोटी रुपयांची कॅश जप्त केली होती. सलमानसहीत चार लोकांना अटक करण्यात आली. ईडी आणि एनआयच्या म्हणण्यानुसार सलमान दिल्लीत राहत होता आणि दुबईत एका पाकिस्तानी इसमाच्या संपर्कात होता. जो इसम इफआयएफच्या उप प्रमुखाशी जोडला गेला होता. सलमान हा मोहम्मद कामरान तसेच मोहम्मद सलमीम उर्फ मामा सहित अनेक व्यावसायिकांकडून खूप पैसा मिळायचा. मिळालेल्या पैसा हा सलमानने हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात उतरवला आणि एक मशीद बांधण्यास त्याचा उपयोग केला. अभियुक्त मोहम्मद सलमान आणि त्याच्या परिवारातील सदस्यांची दिल्लीतील 73.12 लाख रुपयांची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात आली. सलमान सध्या एनआयच्या एका प्रकरणात तिहाड जेलमध्ये बंद आहे. 

Read More