Marathi News> भारत
Advertisement

Gyanvapi Masjid Shivling:आक्षेपार्ह पोस्ट भोवली; AIMIM चे प्रवक्ते Danish Qureshi यांना अटक

एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी  (Danish Qureshi) यांनी शिवलिंगावरून आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणी आता दानिश कुरेशीला अटक करण्यात आली आहे.

Gyanvapi Masjid Shivling:आक्षेपार्ह पोस्ट भोवली; AIMIM चे प्रवक्ते Danish Qureshi यांना  अटक

मुंबई : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा वाद पेटला असताना, आता एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी  (Danish Qureshi) यांनी शिवलिंगावरून आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणी आता दानिश कुरेशीला अटक करण्यात आली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रांचने त्याच्यावरही अटकेची कारवाई केलीय.  

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरील (Gyanvapi Masjid) वाद चांगलाच तापलाय. हे धार्मिक स्थळ मशिद आहे की  मंदिर यावरून हा वाद सुरु आहे. या प्रकरणी वाराणसी कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सूनावणी सुरू आहे. त्यात ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगावरून दानिश कुरेशीने  (Danish Qureshi) आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्यामुळे एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कारेशी यांना हमदाबादच्या सायबर क्राइम ब्रांचने गुजरातमधून अटक केली आहे.

एआयएमआयएमचे नेते दानिश कुरेशी  (Danish Qureshi) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये दानिशने वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगावर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच अपमानास्पद विधान केले होते. यानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, अशी माहिती अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रांचचे एसीपी जेएम यादव यांनी दिली.  

दानिश कुरेशीच्या ट्विटमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्यावर दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. असेही जेएम यादव म्हणाली आहे.  

Read More