Marathi News> भारत
Advertisement

Viral News : 3 दिवस पहिली सोबत 3 दिवस, दुसरी सोबत रहायचे, रविवारी सुट्टी; फॅमिली कोर्टाचे पतीला आदेश

Extramarital Affair :  सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस एका पत्नीसह तर गुरुवार, शुक्रवार आणि शनीवार असे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसह राहण्याचा सल्ला दिला. तर, रविवारी सुट्टी. दोन बायकांच्या नवऱ्याला कोर्टाचे आदेश. 

Viral News : 3 दिवस पहिली सोबत 3 दिवस, दुसरी सोबत रहायचे, रविवारी सुट्टी; फॅमिली कोर्टाचे पतीला आदेश

Extramarital Affair : मध्य प्रदेशातून एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे. हे प्रकरण आहे दोन बायकांचा दादला असलेल्या नव-याचं. एक नवरा आणि त्याच्या दोन बायकांचं (Extramarital Affair). हे प्रकरण थेट कोर्टात पोहचले. नव-यानं पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातले 3 दिवस राहावं आणि दुस-या पत्नीसोबत 3 दिवस राहावं. रविवारच्या दिवशी नव-याला वाटेल त्या पत्नीसोबत तो राहू शकतो, असा अजब गजब आदेश मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरच्या फॅमिली कोर्टानं (Family Court of Gwalior) दिला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

दोन पत्नींचा नवरा असलेला हा व्यक्ती साफ्टवेयर इंजीनियर आहे. त्याच्या पत्नी देखील साफ्टवेयर इंजीनियर आहेत. या व्यक्तीने 2018 साली आपल्या पहिल्या पत्नीशी लग्न केले.  पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा देखील आहे. पहिल्या पत्नीसोबत दोन वर्षे राहिल्यानंतर 2020 मध्ये  पतीने ग्वाल्हेर सोडले आणि तो नोकरी निमित्ताने गुरुग्राममध्ये आला. येथेच त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यासह त्याचे प्रेम संबध जुळले. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या व्यक्तीने संबधीत महिलेसह लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगी झाली आहे. 

प्रकरण कोर्टात कसे पोहचले?

ग्वाल्हेरमध्ये असलेल्या पहिल्या पत्नीला पतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजले. यानंतर तिने थेट गुरुग्राम गाठले. पतीची दुसरी बायको आणि त्यांच्या मुलीला पाहून पहिल्या पत्नीला मोठा धक्का बसला. दोघा पती पत्नींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर हे प्रकरण थेट कोर्टात पोहचले. पहिल्या पत्नीने कौटुंबिक न्यायालयात स्वत:च्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी दावा दाखल केला. पण पहिल्या पत्नीला पतीला घटस्फोट द्यायचा नव्हता. तर, दुसरी पत्नीही पतीला सोडायला तयार नव्हती. 

कोर्टाने काढला मध्य मार्ग

दोन्ही पत्नींनी पतीला सोडम्यास नकार दिला.  यामुळे कोर्टाने तिघांचे समुपदेशन करुन मध्य मार्ग काढला. दोन्ही पत्नींसह राहण्याचा सल्ला कोर्टाने या पतीला दिला. या व्यक्तीने दोन्ही पत्नींना गुरुग्राममध्येच वेगवेगळे फ्लॅट घेऊन दिले. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस एका पत्नीसह तर गुरुवार, शुक्रवार आणि शनीवार असे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसह राहण्याचा सल्ला दिला. तर, रविवारी इच्छेनुसार कोणत्याही पत्नीसह राहू शकतो असे आदेश कोर्टाने दिले.  कोर्टाने सुचवलेल्या या पर्यायावर तिघेजण तयार झाले.     

Read More