Marathi News> भारत
Advertisement

'संसदेवर 13 डिसेंबरला हल्ला करून दिल्लीचं पाकिस्तान करु' खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

Gurpatwant Singh Pannun Video: खलिस्तान मुद्द्यावरून सुरु असणारा वाद आणि तत्सम घडामोडी आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहेत. निमित्त ठरतोय एक व्हिडीओ...   

'संसदेवर 13 डिसेंबरला हल्ला करून दिल्लीचं पाकिस्तान करु' खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

Gurpatwant Singh Pannun Video: खलिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा कटकारस्थानं आणि धमक्यांचं सत्र सुरु केलं असून, आता त्यांनी बऱ्याच मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट होत आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनं पुन्हा एकदा भारतावर वक्रदृष्टी टाकत हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं ही धमकी दिली असून, आपल्याला संपवण्याचा मोदी सरकारचा कट अपयशी ठरला, मात्र आता याचा सूड घेत मी संसदेलाच लक्ष्य करणार, अशी भाषा वापरत त्यानं ही धमकी दिली. 

'संसद की बुनियाद हिला दी जाएगी' अशी भाषा वापरत त्यानं ही धमकी दिली. इतक्यावरच न थांबता त्यानं 13 डिसेंबरच्या हल्ल्यासाठी तयार राहा असा इशारा व्हिडीओतून दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. 13 डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता असा संदर्भसुद्धा त्याच्या बोलण्यातून समोर आला. 

पन्नूनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एकिकडे खलिस्तानचा झेंडा तर, दुसरीकडे संसद हल्ल्यातील दोषी अफजलगुरुचा फोटो स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. दिल्लीचा खलिस्तान करु, पाकिस्तान करु हे असं तो म्हणत असल्यामुळं आता संरक्षण यंत्रणासुद्धा सतर्क झाल्या आहेत. 

'भारतीय संरक्षण यंत्रणांनी मला संपवण्याचा कट रचला होता. पण, त्यात ते अपयशी ठरले आता 13 डिसेंबर किंवा त्याआधीसुद्धा संसदेवर हल्ला करून याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल', असं म्हणत पन्नूनं ही धमकी देताच गुप्तचर यंत्रणांसह इतर सुरक्षा दलांसह दिल्ली पोलिसांनी तातडीनं सुरक्षाव्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल केले. 

अमेरिकेची या प्रकरणात नेमकी काय भूमिका? 

हल्लीच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांनी निखिल गुप्ता नावाच्या एका इसमाला ताब्यात घेत भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या सांगण्यावरून त्यानं गुरपरवंत सिंगच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावला होता. यानंतर भारताकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरिय समिती स्थापन करण्यात आली. राहिला प्रश्न गा गुरपरवंत सिंग पन्नू कोण आहे यासंदर्भातला, तर सिख फॉर जस्टिस (एसजेएफ) चा म्होरक्या असून, एक खलिस्तानी दहशतवादी आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा अशा दोन्ही देशांची नागरिकता असून, तिथूनच तो व्हिडीओंच्या माध्यमातून भारताला धमकी देत असतो. 

 

Read More