Marathi News> भारत
Advertisement

फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलत होती युवती, अचानक झाला स्फोट आणि...

सावधान! चार्जिंगला फोन लावून तुम्हाला कॉलवर बोलायची सवय आहे का? ही सवय आताच सोडा कारण या युवतीसोबत जे घडलं तेच तुमच्यासोबत घडू शकतं

फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलत होती युवती, अचानक झाला स्फोट आणि...

अहमदाबाद: खूपदा आपल्याला मोबाईल चार्जिंगला लावून मेसेज करायची किंवा फोनवर बोलायची वाईट सवय असते. जर ही सवय तुम्हाला असेल तर आजच ती सवय सोडा नाहीतर तुमच्या जीवावर ही सवय बेतू शकते. 12वीमध्ये शिकणाऱ्या या युवतीसोबत जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जर फोन चार्जिंगला लावून तुम्ही बोलत असाल तर सावधान.

फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलत असताना अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या स्फोटामध्ये 12 वीमध्ये शिकणारी युवती गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असताना तिचा मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना गुजरातच्या मेहसाणा इथल्या बेचाराजी तालुक्यातील छेतासन गावात घडली आहे. फोन चार्जिंगला असताना फोनवर बोलू नये असं अनेकदा आवाहन केलं जातं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत युवतीनं तिच चूक केल्यानं तिच्या जीवावर बेतली. 

युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईलची बॅटरी फुटल्याने स्फोट झाला असावा. युवती वरच्या मजल्यावर फोनवर बोलत होती. त्यावेळी स्फोटाचा आवाज आला. दरवाजा संपूर्ण काळा पडला होता. वरच्या खोलीत ठेवलेल्या वस्तूंनीही पेट घेतला. मोबाईलचं चार्जिंग संपल्यानं युवतीनं चार्जिंगला लावला आणि फोनवर बोलण्यात मग्न झाली. मात्र त्यानंतर अचानक स्फोट झाला. 

Read More