Marathi News> भारत
Advertisement

करोडोंची संपत्ती धुडकावत 'गोल्ड मेडलिस्ट' डॉक्टर बनली 'साध्वी'

संसारिक सुखांच्या त्यागाच्या रुपात आपले केस दान करत श्वेत वस्त्र परिधान केले

करोडोंची संपत्ती धुडकावत 'गोल्ड मेडलिस्ट' डॉक्टर बनली 'साध्वी'

सूरत : गुजरातमध्ये एका अतिशय श्रीमंत घरातील एक तरुणी जैन साध्वी बनलीय. २८ वर्षीय हिना हिंगड जैन हीनं करोडोंची संपत्ती धुडकावून लावत 'साध्वी' बनण्याचा निर्णय अंमलात आणलाय. उल्लेखनीय म्हणजे, हिना ही एक डॉक्टर आहे. एमबीबीएसमध्ये तिनं गोल्ड मेडल पटकावला होतं... परंतु, आपल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासावर पाणी सोडत हिनानं अध्यात्माचा रस्ता निवडलाय. एमबीबीएस टॉपर २८ वर्षीय हिना हिंगड हिनं बुधवारी संपूर्ण विधीसोबत संसारिक सुखांचा त्याग परित्याग करत जैन साध्वी बनलीय. आता ती साध्वी श्रीविशारदमाला या नावानं ओळखली जाणार आहे. 

हिऱ्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरतमध्ये हिनानं अध्यात्मिक गुरु आचार्य विजय यशोवर्मा सुरेश्वरजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतलीय. दीक्षा ग्रहणाचा कार्यक्रम सूरतमध्ये सकाळी सुरू झाला. तो दुपारपर्यंत सुरू होता. या दरम्यान तिनं संसारिक सुखांच्या त्यागाच्या रुपात आपले केस दान करत श्वेत वस्त्र परिधान केले.

हिना एका सुखवस्तू कुटुंबातून आहे... तिच्या कुटुंबालाही तिचा हा निर्णय मान्य नव्हता. गेल्या १२ वर्षांपासून ती आपल्या कुटुंबाला यासाठी समजावत होती. त्यानंतर कुटुंबीयांनीही तिच्या निर्णयासमोर गुडघे टेकले. हिनानं दीक्षासाठी गरजेचं मानलं जाणार ४८ दिवसांचं ध्यान गुजरातच्या पालिताणामध्ये केलं. आचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिनानं आपल्या मागच्या जन्मात केलेल्या ध्यान आणि श्रद्धेमुळे भिक्षू बनण्याचा निर्णय घेतलाय. 

घरातून बाहेर पडताना हिनानं केवळ दोन सफेद कपडे आणि एक भांडं घेतलं. हिना आपल्या कुटुंबातील सहा बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. गोल्ड मेडलिस्ट हिना गेल्या तीन वर्षांपासून मेडिकलची प्रॅक्टीस करत होती. विद्यार्थी असतानाच अध्यात्माकडे तिचा ओढा होता. 

Read More