Marathi News> भारत
Advertisement

हार्दिक पटेल म्हणाला मी नाही हरलो, हे हरले आहेत!

गुजरातमध्ये मिळालेल्या अपयशानंतर हार्दिक पटेलने ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिक पटेल म्हणाला मी नाही हरलो, हे हरले आहेत!

नवी दिल्ली/अहमदाबाद : गुजरातमध्ये मिळालेल्या अपयशानंतर हार्दिक पटेलने ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

‘हार्दिक हरला नाही, बेरोजगारी हरली आहे, शिक्षण हरलंय, आरोग्य हरलंय. सर्वसामान्यांच्या प्रत्येक मुद्दा हरला आहे. अनेकांची आशा हरली आहे. आणि EVM मधील छेडछाड जिंकली आहे, असे ट्विट हार्दिकने केले आहे. 

पाटीदार नेता हार्दिक पटेलने भाजपला या विजयासाठी शुभेच्छा देणार नाही. त्यांनी ट्विट करून आरोप केलाय की, भाजप ही निवडणूक बेईमानीने जिंकली आहे. EVM मध्ये छेडछाड करण्यात आली आहे. 

आपल्या ट्विटमध्ये हार्दिक म्हणाला की, ‘जनतेच्या अधिकारांची लढाई सुरूच राहणार, आरक्षण, शेतकरी आणि तरूणांची लढाई आम्ही इमानदारी आणि सत्याच्या आधारावर लढू, जे लढेल तोच जिंकेल, इंकलाब जिंदाबाद’. दुस-या एका ट्विटमध्ये हार्दिक म्हणाला की, ‘हा कसा विजय आहे ज्यात मुठभर लोक सोडले तर सगळा प्रदेश निराश आहे. ही हैराण करणारी बाब आहे. माझा गुजरात परेशान आहे’.

Read More