Marathi News> भारत
Advertisement

मोठी दुर्घटना : कारखान्याची भिंत कोसळून 12 कामगारांचा मृत्यू

Wall Collapse in Morbi: गुजरातमधील मोरबी येथील सागर सॉल्ट कंपनीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 12 कामगारांचा मृत्यू झाला.  

मोठी दुर्घटना : कारखान्याची भिंत कोसळून 12 कामगारांचा मृत्यू

अहमदाबाद : Wall Collapse in Morbi: गुजरातमधील मोरबी येथील सागर सॉल्ट कंपनीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 12 कामगारांचा मृत्यू झाला. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

मोरबी जिल्ह्यातील हलवड येथील सागर सॉल्ट नावाच्या कंपनीत हा अपघात झाला. भिंत कोसळल्याने सुमारे 30 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Read More