Marathi News> भारत
Advertisement

ऑनलाईन गेमिंगसह दैनंदिन वापराच्या गोष्टी महागणार; GST परिषदेतील महत्वाची अपडेट

 GST Council Meeting Update:  जीएसटी काऊन्सिलने काही उत्पादनांवरील जीएसटी वाढवला आहे. त्यामुळे पॅकेज्ड दही, लस्सी, ताक महाग झालंय

ऑनलाईन गेमिंगसह दैनंदिन वापराच्या गोष्टी महागणार; GST परिषदेतील महत्वाची अपडेट

नवी दिल्ली : GST Council Meeting Update:  जीएसटी काऊन्सिलने काही उत्पादनांवरील जीएसटी वाढवला आहे. त्यामुळे पॅकेज्ड दही, लस्सी, ताक महाग झालंय. जीएसटी काऊन्सिलची बैठक चंदीगडमध्ये कालपासून सुरू झालीय. एलईडी लाईट्स, दिवेही महाग झालेत. त्याशिवाय पॉलिश्ड डायमंडही महाग झाले आहेत. सोलर वॉटर हिटरवरील जीएसटीही वाढवण्यात आलाय. आज ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनोवर जीएसटी लागू होण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

28 जूनपासून चंदीगडमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू झाली आहे. सहा महिन्यांनी परिषदेची बैठक होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली चंदीगड येथे झालेल्या 47व्या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत अनेक क्रिप्टोकरन्सीसह मोठ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अर्थमंत्री आज सायंकाळी 5 वाजता जीएसटीच्या निर्णयांची अधिकृत घोषणा करतील. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर शिफारशी करण्यात आल्या असून त्यावर उद्याही चर्चा होणार आहे.

या वस्तूंच्या दरात बदल

- EV वर 5% GST (बॅटरी लावलेली किंवा शिवाय)
- रोपवे सेवेवर 18% ऐवजी फक्त 5% GST
- सांडपाणी प्रक्रिया केलेल्या पाण्यावर 18% GST आता सूट
- पॅकबंद दही, लस्सी आणि बटर मिल्कवर ५% जीएसटी लागेल
- फुगलेला तांदूळ, सपाट तांदूळ, पेरच्ड राइस, पापड, पनीर, मध, अन्नधान्य यावर ५% जीएसटी आकारला जाईल.
- न भाजलेले कॉफी बीन्स आणि प्रक्रिया न केलेल्या ग्रीन टीवर 0% ते 5% GST लागू होईल.

- याशिवाय गव्हाचा कोंडा आणि तांदळाचा कोंडा 0 ते 5% GST
- टेलरिंग आणि टेक्सटाईलमधील इतर जॉब वर्कवर 5% ते 12% GST
- प्रिंटिंग राइटिंग/ ड्रॉइंग इंकवर 5% GST ते 12%
- एलईडी दिवे/दिवे आणि फिक्स्चरवर 12% ते 18% सूट
- सोलर वॉटर हिटर आणि सिस्टिमवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून 12 टक्के
- तयार आणि कंपोझिशन लेदरवर 5% ते 12% GST
- सरकार कामाच्या कराराच्या पुरवठ्यावरील जीएसटी 5% वरून 12% पर्यंत वाढवा
- कट आणि पॉलिश हिऱ्यावरील जीएसटी 0.25% वरून 1.5% पर्यंत वाढला

हॉटेलमध्ये राहणे महागणार

आता नव्या स्लॅबनुसार हॉटेलमध्ये राहणेही महागणार आहे. हॉटेल रूमवर 12% GST लागू होईल. याशिवाय, 5% जीएसटी (ITC शिवाय) अशा रुग्णालयाच्या खोल्यांवर आकारला जाईल ज्यांचे शुल्क 5000 रुपयांपेक्षा जास्त आहे.

Read More