Marathi News> भारत
Advertisement

ट्रिपल तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपचा व्हीप

लोकसभेत  आज ट्रिपल तलाकचं विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. ट्रिपल तलाकसाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

ट्रिपल तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपचा व्हीप

नवी दिल्ली : लोकसभेत  आज ट्रिपल तलाकचं विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. ट्रिपल तलाकसाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

ट्रिपल तलाक देणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्याबाबतचं विधेयक आज संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावला असून सभागृहात हजर राहण्याच्या सूचना दिल्यात. केंद्रीय कॅबिनेटनं १५ डिसेंबरला मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाला मंजुरी दिली होती. 

या विधेयकात ट्रिपल तलाक देणाऱ्या पतीला 3 वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. फेसबुक, व्हॉट्सऍप, एसएमएस किंवा फोनवरून ट्रिपल तलाक देणं बेकायदेशीर असणार आहे. लोकसभेत भाजपकडं बहुमत आहे. मात्र राज्यसभेत या विधेयकाचा मार्ग सुकर करण्याचं मोठं आव्हान एनडीए सरकारपुढं असणार आहे.  

Read More