Marathi News> भारत
Advertisement

12 वी पास असाल तर Government Job ची सुवर्णसंधी! लेखी परिक्षेशिवाय निवड, पगार 81000/ महिना

Government Job Sarkarni Naukri For 12th Pass: तुम्ही 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. पुढील 1 महिना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.

12 वी पास असाल तर Government Job ची सुवर्णसंधी! लेखी परिक्षेशिवाय निवड, पगार 81000/ महिना

CISF Head Constable Recruitment 2023 Notification: तुम्ही 12 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्सटेबल पदासाठी अर्ज मागवले आहेत. योग्य उमेदवारांना सीआएसफच्या या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज आणि या नोकरीसंदर्भातील सर्व माहिती सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली असून या वेबसाईटवरुनच थेट घरबसल्या अर्ज करता येणार आहे. 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान या पदांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहेत.

नेमकी भरती किती पदांसाठी?

सीआयएसएफच्या भरतीमध्ये एकूण 215 पदांसाठी भरती केली जाणार आहे. तुम्हालाही या पदावरील नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही तपशील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. अशीच काही महत्त्वाची माहिती आम्ही येथे खाली दिली आहे.

सीआयएसएफचे फॉर्म भरण्यासाठी पात्रता :

या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती स्पोर्ट्स किंवा अॅथलेटिक्समध्ये राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेली हवी. तसेच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शैक्षिणकि संस्थेकडून मिळालेलं किमान 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र हवं. 

वयोमर्यादेचं बंधन किती?

या पदावरील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय हे 23 वर्ष असावं असं बंधन आहे. म्हणजेच या पदासाठी केवळ 18 ते 23 वयोगटातील व्यक्तींना अर्ज करता येणार आहे.

कोणकोणत्या चाचण्या घेतल्या जाणार?

या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये आधी ट्रायल टेस्ट घेतल्या जातील. त्यानंतर उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी एफिशिएन्सी टेस्ट, फिजिकल स्टॅण्डर्ड टेस्ट घेतल्या जातील. तसेच कागदोपत्री पूर्तता करणेही आवश्यक असणार आहे. सर्व उमेदवारांसाठी आरोग्य चाचणीही बंधनकारक असणार आहे. सर्व शैक्षणिक पूर्तता पूर्ण केलेल्या उमेदवारांचाच विचार या चाचण्यांसाठी केला जाईल.

ही गोष्ट फार महत्त्वाची

भरतीच्या सर्व टप्प्यांमध्ये कॉल-अप लेटर किंवा प्रवेशासाठी आवश्यक असणारं ओळखपत्र केवळ सीआरएसएफच्या भरतीच्या वेबसाईटवर ऑनलाइन माध्यमातून जारी केलं जाणार आहे. यासाठी सरकारकडून इतर कोणत्याही संस्था, संघटनांना काम देण्यात आलेलं नाही. त्यामुळे या भरतीसंदर्भातील सर्व प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवरुनच केली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणत्या वेबसाईटवरुन करता येईल अर्ज?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवार https://cisfrectt.cisf.gov.in/ < या लिंकवर क्लिक करुन सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. सर्व भत्ते आणि मासिक वेतन पकडून महिन्याला 81 हजार रुपयांहून अधिक रक्कम सीआरएसएफ हेड कॉन्सटेबलला मिळते. 

Read More