Marathi News> भारत
Advertisement

स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांना गूगल डूडलद्वारे श्रद्धांजली

 समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या ११५व्या जयंतीनिमित्त गूगलने डूडलद्वारे त्यांना मानवंदना वाहिली आहे.

स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांना गूगल डूडलद्वारे श्रद्धांजली

मुंबई : समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या ११५व्या जयंतीनिमित्त गूगलने डूडलद्वारे त्यांना मानवंदना वाहिली आहे. 'Kamaladevi Chattopadhyay's 115th Birthday' अशे शीर्षक देऊन गूगलने डूडल साकारुन कमलादेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या डूडलमध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी केलेल्या कार्याची अनोखी झलकही पाहायला मिळत आहे.

कलमादेवी यांची दूरदृष्टी

कलमादेवी यांच्या दूरदृष्टीमुळेच अनेक उपक्रम सुरु झालेतय. आज देशात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकॅडमी, सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज इम्पोरियम आणि क्राफ्ट काऊंसिल ऑफ इंडिया या कला प्रदर्शनासंबंधित संस्था उभ्या राहिल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कमलादेवी यांनी रंगभूमी आणि हातमागावरील उद्योगक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. समाजात शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

१४ व्या वर्षी विवाह 

कमलादेवी यांचा जन्म मंगळुरू (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील मंगळुरूचे जिल्हाधिकारी होते. कमलादेवी केवळ सात वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले  होते. कमलादेवी यांचे वयाच्या १४ व्या वर्षी विवाह झाला. लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांचे पती कृष्ण राव यांचे निधन झाले. 

लोकांच्या बोलण्याकडे केले दुर्लक्ष

कमलादेवी या चेन्नईमधील क्वीन मेरीज कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. त्यावेळी सरोजिनी नायडू यांच्या लहान बहिणीबरोबर त्यांची भेट झाली. त्यांनी कमलादेवी आणि भाऊ हरेंद्र नाथ चट्टोपाध्याय यांची ओळख करुन दिली. या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली. आणि पुढे दोघे विवाहबंधनात अडकले.

दरम्यान, त्यांनी पुर्नविवाह केल्यामुळे त्यांना अनके अडचणींचा तोंड द्यावे लागले. मात्र त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष करीत आपले समाज कार्य सुरु ठेवले.

Read More