Marathi News> भारत
Advertisement

Year Ender 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Year Ender 2022 : नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत. मात्र, 2022मध्ये अनेकांनी ऑनलाईन ऑर्डरला प्राधान्य देताना बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डरसह नवीन विक्रम केला आहे. यंदा दर मिनिटाला 137 बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्यात.

Year Ender 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Year Ender 2022 : Swiggy हे भारतातील लोकप्रिय फूड डिलीव्हरी  प्लॅटफॉर्म (Food delivery platform) आहे. स्विगीने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये 2022 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त काय ऑर्डर केले आहे हे सांगितले आहे. स्वीगीच्या अहवालनुसार, बिर्याणी यावर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डर देऊन नवा विक्रम केल्याचे या अहवालात समोर आले आहे. यंदा दर मिनिटाला बिर्याणीच्या 137 ऑर्डर होत्या. 

swiggy वर सर्वाधिक ऑर्डर केलेली यादी

swiggyच्या अहवालानुसार, चिकन बिर्याणी, मसाला डोसा, चिकन फ्राईड राईस, पनीर बटर मसाला, बटर नान, व्हेज फ्रायड राइस, व्हेज बिर्याणी आणि तंदूरी चिकनची ऑर्डर दिली गेली. स्विगीच्या नवीन अहवालात असेही दिसून आले आहे की, लोक एक्सपेरिमेंटच्या मूडमध्ये होते. भारतीय खाद्यपदार्थांव्यतिरिक्त लोकांनी इटालियन पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाऊल, मसालेदार रामेन आणि सुशी देखील ऑर्डर केली. याशिवाय अनेक पदार्थ भारतीयांनी चाखले. 

स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेले स्नॅक्स

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समोसेला खूप मागणी होती. एकूण 4 दशलक्ष ऑर्डर्ससह समोसा यावर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या स्नॅक्सच्या यादीत अव्वल आहे. समोसाशिवाय पॉपकॉर्न, पावभाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडस्टिक्स, हॉट विंग्स, टॅको, क्लासिक स्टफ्ड गार्लिक ब्रेड आणि मिंगल्स बकेट टॉपवर आहेत. मिठाईमध्ये गुलाब जामुन अव्वल ठरला.

मिठाईत गुलाब जामुन अव्वल  

मिठाईच्या यादीत गुलाब जामुन अव्वल स्थानावर आहे. 2.7 दशलक्ष ऑर्डरसह गुलाब जामुन, 1.6 दशलक्ष ऑर्डरसह रसमलाई, 1 दशलक्ष ऑर्डरसह चोको लावा केक, रसगुल्ला, चोकोचिप्स आइस्क्रीम, अल्फोन्सो मॅंगो आइस्क्रीम, काजू कटली, टेंडर कोकोनट आइस्क्रीम सर्वाधिक ऑर्डर केले गेले. 

Read More