Marathi News> भारत
Advertisement

SBI कडून ग्राहकांसाठी Good News,आता Fixed Deposit वर मिळणार जास्त व्याज

बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

SBI कडून ग्राहकांसाठी Good News,आता Fixed Deposit वर मिळणार जास्त व्याज

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या मुदत ठेवी (FD) वर उपलब्ध व्याजदरात वाढ केली आहे. ज्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.

बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही 2ते 3 वर्षांचा FD ठेवला तर तुम्हाला त्यावरील व्याजदर वाढवून मिळेल.

हा व्याजदर पूर्वी 5.10%  होता जो आता बदललेल्या नियमानुसार 5.20%  झाला ​​आहेत. दरम्यान, 2-5 वर्षांसाठी FD व्याजदर 15 बेसिस पॉइंट्सने वाढवून 5.45% केले आहेत. यापूर्वी यावर 5.30 टक्के दराने व्याज मिळत होते.

तसेच 5-10 वर्षांच्या मुदतीच्या FD साठी, व्याज दर 5.50% पर्यंत केले आहेत. २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर सुधारित व्याजदर लागू होतील. 

परंतु अल्प-मुदतीच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही. 1 ते 2 वर्षांच्या FD वर 5.10% दराने व्याज उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्ही FD 2 वर्षापेक्षा कमी ठेवली तर तुम्हाला जो आहे तोच, व्याज वाढवून मिळेल.

211 दिवस-1 वर्ष कालावधीच्या FD वरील दर सध्या 4.40% वर ठेवले आहेत. यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 180-210 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी व्याज दर 4.40% वर ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही.

Read More