Marathi News> भारत
Advertisement

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दरवर्षी 6000 ऐवजी 36000 रुपये मिळतील, फक्त एवढेच काम करा

PM kisan Man dhan Yojna:  पीएम किसान सन्मान निधीच्या ( PM Kisan Samman Nidhi) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दरवर्षी 6000 ऐवजी 36000 रुपये मिळतील, फक्त एवढेच काम करा

मुंबई : PM kisan Man dhan Yojna:  पीएम किसान सन्मान निधीच्या ( PM Kisan Samman Nidhi) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये मिळू शकतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज द्यावे लागणार नाहीत. पीएम किसान मन धन योजनेअंतर्गत (PM kisan Man dhan Yojna) शेतकऱ्यांना दरवर्षी 36000 रुपये मिळू शकतात.

आता शेतकऱ्याला दरवर्षी 36,000 रुपये 

पीएम किसान मन धन योजनेअंतर्गत  (PM kisan Man dhan Yojna Benefits) शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत, वयाच्या 60 वर्षांनंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते, म्हणजेच 36000 रुपये प्रति वर्ष असणार आहे. वास्तविक, मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी ही रक्कम देते.

आवश्यक कागदपत्रे

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. जसे आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील आदी. परंतु जर तुम्ही पीएम किसानचा लाभ घेत असाल तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकता नाही.

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

1.18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2. यासाठी लागवडीयोग्य जमीन जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत असावी.
3. किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे शेतकऱ्याच्या वयानुसार 55 ते 200 रुपयांपर्यंत मासिक योगदान द्यावे लागेल.
4. वयाच्या 18 व्या वर्षी सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 55 रुपयांचे मासिक योगदान देय असेल.
5. तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास तुम्हाला 110 रुपये जमा करावे लागतील.
6. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सहभागी असाल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

Read More