Marathi News> भारत
Advertisement

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Today Rate : लग्नसराईत सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, सोने- चांदीचे दर घसरले

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Today Rate : देशभरात लग्न सोहळे सुरु आहेत. या लग्नसराईत सोने खरेदी (Gold Silver Price) करणाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण झाली आहे. सणासुदीपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र आज सोन्या-चांदीचे दर काहिसे खाली आले आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

गेल्या दोन महिन्यांत सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्या-चांदीत (Gold Silver Rate) पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) सोबतच सराफा बाजारातही सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) दर खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.  

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) मार्केटवर शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास, सोन्याचा फ्यूचर रेट 41 रुपयांनी घसरला आणि 52 हजार 630 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. तर चांदी 147 रुपयांनी घसरून 61 हजार 846 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत असल्याचे दिसून आले. सत्राच्या सुरुवातीला सोने 52 हजार 671 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61 हजार 993 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.  

सराफा बाजारातही सोन्याच्या (Gold Rate) दरात घसरण झाली. इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 41 रुपयांनी घसरून 52 हजार 662 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी 999 शुद्धतेची चांदी 61 हजार 777 रुपये प्रति किलोवर पोहोचली. 23 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 451 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 48 हजार 238 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 39 हजार 497 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

दरम्यान सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात किरकोळ घसरण झाली आहे. मात्र हे दर आणखीण खाली यावे अशी प्रतिक्षा ग्राहत करतायत.  

Read More