Marathi News> भारत
Advertisement

Gold-Silver Price : होळीनंतर सोने-चांदी किमतीत झाला मोठा बदल, आता 10 ग्रॅमचा 'हा' आहे दर

Gold-Silver Price Today : गेल्या महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold silver Price) दरांनी अनेकांची झोप उडवली होती. सोन्याने 59,000 हजारांपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण आता पंधरा दिवसांपासून सोन्याचे भाव चढउतार होत असले तरी विक्रमी भावापर्यंत त्याने उडी घेतली नाही. 

Gold-Silver Price :  होळीनंतर सोने-चांदी किमतीत झाला मोठा बदल, आता 10 ग्रॅमचा 'हा' आहे दर

Gold-Silver Price on 8 March 2023:  गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. होळीच्या (holi 2023) तोंडावर सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र आता होळीच्या दिवशी सोने स्वस्त झाले असून चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. आज देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,380 रुपये आहे. तर काल हे दर 51,530 रुपये एवढे होते. म्हणजेच आज दीडशे रुपयांने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव असाच होता.

गेल्या पंधरा दिवसात म्हणजेच 25 फेब्रुवारीला शुद्ध सोन्याचा भाव 56,330 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51650 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, 22 कॅरेटच्या भावात 300 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 220 रुपयांची वाढ झाली आहे. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. 

वाचा : पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आज काय आहे दिल्ली ते मुंबईमध्ये तेलाचे दर 

चेन्नई - 57,110 रुपये

दिल्ली - 56,500 रुपये

हैदराबाद - 56,350 रुपये

कोलकत्ता - 56,350 रुपये

लखनऊ - 56,500 रुपये

मुंबई - 56,350 रुपये

पूणे - 56,350 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घेणार

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते. त्याच वेळी, काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.

जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24K सोने विलासी असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read More