Marathi News> भारत
Advertisement

Gold Silver Price Today | सुवर्ण झळाळी वाढतेय; चांगल्या रिटर्नसाठी गुंतवणूकदार तयार

सोन्याच्या दरांमध्ये अपेक्षेप्रमाणे आता वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात चांगली उसळी घेतल्यानंतर सोन्याचे दर यापुढेही वाढत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gold Silver Price Today | सुवर्ण झळाळी वाढतेय; चांगल्या रिटर्नसाठी गुंतवणूकदार तयार

मुंबई : सोन्याच्या दरांमध्ये अपेक्षेप्रमाणे आता वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात चांगली उसळी घेतल्यानंतर सोन्याचे दर यापुढेही वाढत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर 400 रुपये प्रतितोळे वाढले होते. सोन्याच्या दरांमध्ये काही महिन्यांपासून आलेली सुस्ती आता उतरताना दिसतेय. सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येण्याची चिन्ह दिसत आहेत.

आज MCX मध्ये सोन्याचे दर दुपारी 48 हजार 444 रुपये प्रति तोळेवर ट्रेड करीत होते. तर चांदी 69 हजार 683 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करीत आहे.

भारतीयांमध्ये सोन्याची प्रचंड क्रेझ आहे. भारतीयांच्या अनेक सण समारंभांमध्ये सोन्याला चांगले महत्व आहे. त्यामुळे सध्या सोन्याचे दर काय ? याबाबत अनेकांना उत्सुकता असते. अनेक लोक सोन्यात गुंतवणूक देखील करतात.

 मुंबईत आज सोन्याचे दर
 22 कॅरेट 47 हजार 090 रुपये प्रतितोळे
 24 कॅरेट 48 हजार 090 रुपये प्रतितोळे
 
 मुंबईत आज चांदीचे दर
 69 हजार 500 रुपये प्रतिकिलो 
 
 सोन्याचे दर कमी झाले की त्यात गुंतवणूक करून दर वाढल्यावर चांगला परतावा मिळवतात. गेल्यावर्षी सोन्याचे दर 55 हजार रुपये प्रति तोळा इतके झाल्यानंतर अनेकांनी त्यातून चांगले रिटर्न्स मिळवले होते.  सोन्याच्या त्या उच्चांकी दरानंतर आजही सोने जवळपास 7000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 

----------------------------------------- 
 (सोन्याच्या संबधी दिलेले दर हे कोणतेही कर न लावता आहेत. स्थानिक बाजारपेठांमध्ये हे दर बदलू शकतात)
Read More