Marathi News> भारत
Advertisement

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

Gold Silver Price Today: ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाला पुन्हा झळाळी आल्याने खरेदीदार अडचणीत सापडले आहेत. दसरा आणि दिवाळी तोंडावर आले असतानाच पुन्हा सोने महागले आहे. जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढून 120 रुपयांनी वाढून 58,059 रुपयांवर आज स्थिर झाले आहेत.  तर, चांदीच्या दरातही 250 रुपयांनी वाढ झाली असून कॉमोडिटी बाजारपेठेत चांदी 69,680 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात दरात वाढ

जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव उतरणीला लागले होते. मात्र, इस्राइल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका बसल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. कॉमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1890 डॉलर प्रति ऑन्सवर ट्रेड करत आहेत. कर, चांदीची किंमतही 22.25 डॉलर प्रति ऑन्सवर ट्रेड करत आहेत. त्यामुळं सणासुदीत दागिने खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

सोन्याचे भाव चढेच

सराफा बाजारात सोन्याचे भाव चढेच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉमोडिटी मार्केटमध्ये 57,250 रुपयांच्या स्टॉपलॉससह सोने खरेदी करता येऊ शकते. त्यानंतर बाजारात सोन्याचे भाव 58200 ते 58300 रुपयांपर्यंत जाऊ शकते. चांदीची किंमत 70,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.

सराफा बाजारातही सोने-चांदीचे भाव वाढले 

सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 350 रुपये वाढीसह 54 हजार रुपयांवर पोहोचले तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 380 रुपये वाढीसह ५८,९१० रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदी ५०० रुपयांनी वाढून ७२,६०० रुपयांवर पोहोचली आहे.

Read More