Marathi News> भारत
Advertisement

सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक

कोरोनाच्या संकटातही वाढतोय सोन्याचा दर 

सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक

मुंबई : सोन्याच्या दरात मोठी उसळी आली असून २४ कॅरेट गोल्डच्या भावात ऐतिहासिक वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा दर हा ५३,००० रुपये आहे. तर चांदीचा आजचा दर हा ६५,००० प्रति किलो आहे. 

देशभरात सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर हा सोमवारी १५६ रुपये प्रति १० ग्रॅम उघडला तर ९६ रुपयाने वाढून ५२,४६५ रुपये बंद झाला आहे. तर चांदीचा दर हा थोडा कमी झाला आहे. १७७५ रुपये प्रति किलो नुकसान होऊन ६२,७३० रुपये इतका आता आहे. 

इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २८ जुलै २०२० रोजी देशभरात सराफा बाजारात सोने-चांदीचा दर खालील प्रमाणे 
२४ कॅरेट सोन्याचा दर हा ५२,४६५ प्रति १० ग्रॅम आहे. तर २३ कॅरेटचा दर हा ५२,२५५ रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर हा ४८,०५८ इतका आहे. तर १८ कॅरेटचा सोन्याचा दर हा ३९३४९ इतका आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी होत दिल्ली सराफा बाजारावर याचा परिणाम झाला. मंगळवारी सोन्याचा दर १८७ रुपयांनी कमी झाला असून आता १० ग्रॅम सोने हे ५२,८४६ रुपये इतका आहे.  

कोरोनाच्या संकटातही सोन्या-चांदीचा दर वाढत आहे. या संकट काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जात आहे. मौल्यवान धातूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी वाढत असून पुरवठा नसल्याने सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 

Read More