Marathi News> भारत
Advertisement

रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today On 21st May 2024: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज उच्चांकी वाढीनंतर थोडा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे. 

रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today On 21st May 2024: आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात घट करण्याची शक्यता वर्तवल्यानंतर आणि मिडल ईस्टमध्ये तणाव असल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या वाढत्या दराने नवीन रेकॉर्ड केला आहे तर, चांदीच्या दराने तब्बल 11 वर्षांच्या रेकॉर्ड मोडला आहे. ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईस यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे तर सौदी अरबचे राजा सलमान यांची प्रकृती ढासळत चालली आहे. अशावेळी या दोन देशांमध्ये राजकीय अस्थिरता असताना याचा परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर होऊ शकतो. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र, आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुड रिटर्ननुसार, आज मंगळवारी सोन्याच्या दरात 650 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 74,510 इतके आहेत. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 68,300 रुपये इतके आहेत. चांदीच्या किंमतीत आज 2,000 रुपयांपेक्षा अधिक घट झाली आहे. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास 2005 रुपयांनी घट झाल्यानंतर चांदी 93262 रुपये किलोच्या दराने ट्रेड करत आहे.

सोन्याच्या दरात वाढ का?

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील अनेक प्रमुख केंद्रीय बँका सोनं खरेदी करण्याच्या रांगेत आहेत. यात चीन,भारत आणि रशिय यांचाही सहभाग आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाच्या वाढत्या कर्जामुळंही सोन्याच्या दरात वाढ होत आहे. याच कारणामुळं सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा वर्षाअखेरील सोन्याची किंमत 80 हजारांपार जाऊ शकते. तर, 2025पर्यंत 10 ग्रॅम सोन्याच्या दर दीड लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सोन्याचे दर कसे असतील

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   68,300 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   74,510  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55, 880 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,830 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,451 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,588  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   54,640 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   59,608 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44,704  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  68,300 रुपये 
24 कॅरेट- 74,510  रुपये
18 कॅरेट- 55, 880  रुपये

Read More