Marathi News> भारत
Advertisement

आठवडाभराच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ

एका आठवड्याभराच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. 

आठवडाभराच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ

नवी दिल्ली : एका आठवड्याभराच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती १७० रुपयांनी वाढून ३०,४२० रुपये प्रती तोळा झाल्या आहेत. तर चांदीचे भावही १०० रुपयांनी वाढून ३८,१०० रुपये प्रती किलो झाली आहे. ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३०,४२० रुपये तोळा आणि ९९.५ टक्के शुद्ध सो्न्याची किंमत ३०,२७० रुपये तोळा झाली आहे. सोन्याच्या बिस्कीटांचा भाव २४,४०० रुपये प्रती आठ ग्रॅमवर कायम आहे.

मागच्या आठवड्यात पडले होते भाव

मागच्या आठवड्यामध्ये दागिने विक्रेत्यांची कमी झालेली मागणी, कमजोर झालेला आंतरराष्ट्रीय बाजार आणि सुट्ट्यांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली. मागच्या आठवडा भरामध्ये सोन्याचे भाव ४५० रुपयांनी कमी झाले होते. तर चांदीचे दर १ हजार रुपयांनी उतरले होते. 

Read More