Marathi News> भारत
Advertisement

Gold Price : डॉलरच्या मजबुतीनंतर सोन्याच्या दरावर दबाव, 10 ग्रॅम सोन्याचा दर

सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल 

Gold Price : डॉलरच्या मजबुतीनंतर सोन्याच्या दरावर दबाव, 10 ग्रॅम सोन्याचा दर

मुंबई : Gold/Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराचा दिवस असलेल्या सोमवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोन्याचा दर 0.12 टक्के प्रति 10 ग्रॅमच्या दरात वाढ झाली आहे. सप्टेंबर वायदा चांदीच्या किंमतीत 0.40 टक्के प्रति किलोग्रॅममध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दर घसरणीकडेच बंद झाला आहे. तर चांदीच्या दराने 0.70 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. 

गेल्या 4 महिन्यातील सर्वांत निच्चांक स्तरावर 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 45600 रुपये इतका होता. या गिरावटीनंतर सोन्याच्या दरात सुधारणा झाली. मात्र धातूचा दर 10 ग्रॅम करता 56,200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता सोन्याच्या दराने 10 ग्रॅम करता 9000 रुपयांचा निच्चांक रेकॉर्ड गाठला आहे. 

सोन्या-चांदीचा नवा दर (Gold Silver Price) 

डॉलरच्या मजबुतीनंतर सलग चौथ्या दिवशी सोन्या- चांदीचा व्यवहार मोठा बदल पाहायला मिळाला. एमसीएक्सवर ऑक्टोबर वायदा सोन्याच्या दरात 58 रुपये वाढ झाली आहे. आता सोन्याचा दर 10 ग्रॅम करता 47216 रुपये आहे. सप्टेंबर वायदा मध्ये चांदीच्या दरात 230 रुपये वाढ झाली असून आता दर 61951 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. 

वैश्विक बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळ आहे. सोनं 0.1 टक्के खाली घसरून आता 1,779.12 डॉलर प्रति टक्के झालं. तर डॉलरचा दर नऊ महिन्यांच्या उत्तर स्तरावर 93.33 जवळ व्यवहार सुरू होता. डेल्टा कोरोनाव्हायरसच्या प्रसारामुळे आर्थिक व्यवहारात घसरण पाहायला मिळत आहे. चांदीची किंमत 0.2 टक्के वाढ झाली असून आता 23.05 डॉलर प्रति टक्के आहे. 

सोन्यात येऊ शकते घसरण 

सोन्याच्या गुंतवणूकदारांना UBS Group ने सतर्क केलं आहे. कोरोनानंतर आर्थिक व्यवहारात सुधारणा होत आहे. अमेरिकेतील जॉब मार्केटचा डाटा अपेक्षापेक्षा चांगला आहे. 

Read More