Marathi News> भारत
Advertisement

Gold Silver Price Today | सणासुदीला सोन्या-चांदीच्या दरात घट, पाहा नवे दर

सोन्या-चांदीच्या दरात (Gold and silver price) सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. 

Gold Silver Price Today | सणासुदीला सोन्या-चांदीच्या दरात घट, पाहा नवे दर

मुंबई : राज्यात सर्वत गणेशोत्सावाचा (Ganeshotsav 2021) माहोल आहे. सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यातच सोन्यासह चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाली आहे. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करतात. त्यात दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (Gold and silver prices fall for second day in a row find out new rates)  

सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. एक तोळ्यामागे सोन्याचा दरात 500 रुपयांनी घट झाली आहे. तसेच चांदीही 1 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं, चांदी स्वस्त झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

सुवर्ण नगरी जळगावात गेल्या 48 तासांमध्ये सोन्याच्या दरात प्रतितोळा 500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 1000 रुपयाने घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्याचे भाव कमी झाल्याने जळगावात देखील सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचे आजचे भाव 47 हजार 800 प्रतितोळा तर चांदीचे भाव 67 हजार 100 प्रतिकिलो आहेत.

22 कॅरेट सोन्याचे दर

गुड्सरिटर्नच्या वेबसाईटनुसार; देशातील सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर वेगळे असतात. मुंबईत सोन्याचे दर 46 हजार 410 रूपये आहे. तर दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये क्रमशः 46 हजार 550 रूपये, 44 हजार 740 रूपये , 46 हजार 850 रूपये आहे. 

24 कॅरेट सोन्याचे दर

गुड्सरिटर्नच्या वेबसाईटनुसार; देशातील सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर वेगळे असतात. 8 सप्टेंबर रोजी मुंबईत सोन्याचे दर 47 हजार 400 रूपये आहे. तर दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये क्रमशः 50 हजार 780 रूपये, 48 हजार 570 रूपये , 49 हजार 540 रूपये आहे. 

Read More