Marathi News> भारत
Advertisement

गोव्याला केंद्रात स्वतंत्र राज्य मंत्रीपद

केंद्रातील मोदी सरकारमध्ये गोव्याला स्थान देण्यात आले आहे.  

गोव्याला केंद्रात स्वतंत्र राज्य मंत्रीपद

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारमध्ये गोव्याला स्थान देण्यात आले आहे. याआधी संरक्षणमंत्री पद मिळाले होते. मनोहर परिर्कर यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले होते. आता तर गोव्याला स्वतंत्र राज्य मंत्रीपद देण्यात आले आहे. श्रीपाद नाईक यांची मंत्रीपदावर वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यात उत्साहाचे वातावरण आहे. श्रीपाद नाईक दिल्ली गेले होते. त्यांनी केंद्रीय अर्थ मंत्रीराहिलेले अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. त्यावेळी श्रीपाद नाईक यांना यावेळी पुन्हा मंत्रिपद मिळणार की नाही हे स्पष्ट होत नव्हते. श्रीपाद नाईक हे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा जिंकून आल्याने त्यांना मंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा गोव्यात सुरू होती. 

श्रीपाद नाईक यांना केंद्रातून फोन आल्याने त्यांचे मंत्रिपद निश्चित झाले. नाईक यांनी आपल्याला निमंत्रणही आल्याचे सांगितले. नाईक यांनी यापूर्वी वाजपेयी मंत्रिमंडळातही काम केले आहे. त्यांनी अनेक मंत्रालयांचा कारभार केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने हाताळला आहे. 

श्रीपाद नाईक हे सलग पाचवेळा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून जिंकून आले आहेत. १९९९ सालापासून ते उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा ८० हजार मतांच्या फरकाने पराभव केला आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

Read More