Marathi News> भारत
Advertisement

'गो एअर' विमान कंपनीची प्रवाशांसाठी खास 'रिपब्लिक डे ऑफर'

'गो एअर' या विमान कंपनीची प्रवाशांसाठी खास 'रिपब्लिक डे ऑफर' 

'गो एअर' विमान कंपनीची प्रवाशांसाठी खास 'रिपब्लिक डे ऑफर'

नवी दिल्ली : 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी गो एअर या विमान कंपनीने प्रवाशांसाठी खास 'रिपब्लिक डे ऑफर' सुरू केली आहे. गो एअरने ही ऑफर 999 रूपयांपासून सुरू केली आहे. या ऑफरमध्ये देशातील 26 ठिकाणांसाठी तिकीट बुक केले जाऊ शकते. कंपनीची  ही ऑफर 24 ते 26 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या तीन दिवसांच्या ऑफरमध्ये जे लोक तिकीट खरेदी करतील त्यांना 9 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर दरम्यान 999 रूपयांत विमान प्रवास करता येणार आहे. गो एअरच्या वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकता. वेबसाईटवरून कोणत्या मार्गासाठी किती तिकीटाचे किती दर आकारले जाणार आहेत याची माहिती मिळू शकेल.

अहमदाबाद, भुवनेश्वर, बंगळुरू, मुंबई, कोलकाता, कोची, दिल्ली, गुवाहाटी, गोवा, हैदराबाद, बागरडोगरा, चंदीगढ, रांची, जयपूर, लखनऊ, चेन्नई, नागपूर, पटना, पुणे, श्रीनगर अशा विविध 26 ठिकाणांचे तिकीट बुक करता येऊ शकते. अधिक माहितीसाठी गो एअरच्या www.goai.in वर तिकीट बुक करू शकता. 

Read More