Marathi News> भारत
Advertisement

गोवा विधानसभेत सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर

गोव्याचं भाजप सरकार तरलं.

गोवा विधानसभेत सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर

पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याआधी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र ही श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत भावूक झाले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यासाठी विधानसभेचं एक दिवसाचं खास अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. २० विरुद्ध १३ अशा मतांनी हा विश्वासदर्शक ठराव पास झाला. गोव्यात काँग्रेसकडं सर्वाधिक आमदार आहेत. मात्र भाजपनं महाराष्ट्र गोमंतवादी पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. भाजपचे १२ आमदार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २, गोवा फॉरवर्डचे ३ आणि २ अपक्ष आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी १९ आमदाराचं पाठबळ हवं होतं.

Read More