Marathi News> भारत
Advertisement

GK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र

Early Sunrise : भारतात असे एक गाव आहे, तेथे पहाटे 3 वाजताच सूर्य किरणे पाहायला मिळतात. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या डोंग खोऱ्यात सूर्य प्रथम उगवतो. त्यावेळी देशात दुपार संपण्याची वेळ येते. त्यावेळी इथले लोक रात्रीचे जेवण शिजवून झोपण्याच्या तयारी करत असतात. येथूनच भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला लागून आहेत.

 GK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र

Early Sunrise In India : निसर्ग कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. असे सांगितले जाते की, जर कोणाला देवाचे आपल्यावरील अपार प्रेम आणि या प्रेमाचे सौंदर्य पहायचे असेल तर सूर्योदय नक्कीच पाहा. सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर आल्यावर आपल्याला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साह वाटतो. भारतातील अरुणाचल प्रदेशात सूर्य प्रथम उगवतो, हे सर्वांना माहीत असेलच. पण आज आपण इथल्या त्या गावाविषयी बोलणार आहोत जिथे देशाच्या इतर भागांपेक्षा सूर्याची किरणे खूप लवकर लोप पावतात.

 सूर्याची पहिली किरणे येथे पाहायला मिळतात

आपल्या देशात ( Early Sunrise In India) जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे प्रथम अरुणाचल प्रदेशच्या भूमीवर पडतात. आज आम्ही राज्यातील त्या खास ठिकाणाबद्दल बोलत आहोत जिथे सूर्याची किरणे सर्वात आधी येतात. डोंग व्हॅलीची वेदांग व्हॅली हे राज्यातील ठिकाण आहे. जिथे सूर्य प्रथम दिसतो. भारत, चीन आणि म्यानमारच्या ट्राय जंक्शनवर वसलेले हे छोटेसे गाव ईशान्य सीमेवर असलेले देशाचे पहिले गाव म्हणता येईल. 

पहाटे 3 वाजताच पूर्ण प्रकाश येतो 

देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईसह देशातील बहुतांश भाग गाढ झोपेत असतात, त्यानंतर या डोंग गावात सूर्याची पहिली किरणे पडतात. येथे पहाटे 3 वाजता सूर्य दार ठोठावतो आणि सूर्य किरणे दरवाज्यातून घरात येतात. मात्र, दुसरीकडे येथे संध्याकाळही लवकर होते. देशाच्या इतर भागात दुपारचे 4 वाजले की, इथे रात्र असते. डोंग व्हॅलीला वर्षाच्या कोणत्याही दिवशी जाऊ शकता. परंतु सर्वोत्तम वेळ एप्रिल ते ऑक्टोबरची असते. 

दिवस लहान तर रात्र मोठी

डोंग गावात दिवस हा 12 तासांचा आहे. देशाच्या इतर भागातील लोक संध्याकाळी 4 वाजता चहा बनवतात तेव्हा या गावातील लोक रात्रीचे जेवण बनवण्यात आणि झोपण्याच्या तयारीत व्यस्त असतात. डोंग गावाचे नैसर्गिक सौंदर्य सुमारे 1,240 मीटर उंचीवर आहे. लोहित आणि सती नद्यांच्या संगमावर हे गाव वसलेले आहे. 

पूर्वी लोकांना याची माहिती नव्हती !

पूर्वीपर्यंत असे मानले जात होते की, भारतातील सूर्याची पहिली किरणे अंदमानच्या कच्छल बेटावर पडायची. 1999 मध्ये हे ठिकाण अंदमानात नसून अरुणाचल प्रदेशात असल्याचे कळले. यानंतर निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग प्रेमींना डोंग गावाने भुरळ घातली. दरवर्षी नवीन वर्षात हे दृश्य पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे आवर्जुन भेट देत असतात.

Read More