Marathi News> भारत
Advertisement

प्रेमभंग झालेल्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर प्रेयसीवर गुन्हा दाखल होऊ शकतो का? कोर्ट म्हणत...

Love Affair News: प्रेमभंग झाल्याप्रकरणी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र या प्रकरणी तिच्यासह तिच्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

प्रेमभंग झालेल्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर  प्रेयसीवर गुन्हा दाखल होऊ शकतो का? कोर्ट म्हणत...

Love Affair News: प्रेमभंग झाल्यानंतर किंवा एकतर्फी प्रेमातून तरुण आत्महत्या करत असल्याच्या घटना घडत आहे. प्रेम प्रकरणातून एखादा व्यक्ती आत्महत्या  करत असेल तर त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? या प्रकरणी छत्तीसगड उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीत कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 

23 जानेवारी 2023 रोजी एका तरुणाने त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मयत व्यक्तीने त्याच्या प्रेयसीसह तिच्या भावांवर आरोप करत एक सुसाइड नोटदेखील लिहली होती. दोन पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी आरोप केले आहेत की, त्याचे महिलेसोबत जवळपास 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तिने नंतर त्याच्यासोबत ब्रेकअप करुन दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न केले. मयत व्यक्तीने महिलेच्या भावांवरही आरोप केले होते. त्यांनी महिलेला त्यांच्या बहिणीसोबत संबंध न ठेवण्याची धमकी दिली होती. त्यामुळंच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले होते. 

मयत तरुणाच्या काकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत तिघांवर आरोप केला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2023 रोजी तिघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 306 आणि 34 अंतर्गंत तक्रार दाखल करत तिघांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तिघांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांविरोधात हायकोर्टात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणी त्यांना दिलासा दिला आहे. 

बार अँड बँचने दिलेल्या माहितीनुसार, सुनावणीत न्यायाधीश पार्थ प्रतीम साहू यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो आणि आत्महत्या करतो किंवा एखाद्यावर गुन्हा दाखल झाल्यावर तो आत्महत्या करतो अशावेळी त्याच्या शिक्षकांना किंवा वकिलांना दोषी ठरवता येणार आहे. 7 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात न्यायाधीश साहू यांनी स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या प्रियकराने प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या केली, जर एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेतील खराब कामगिरीमुळे आत्महत्या केली तर अनुक्रमे त्या प्रेयसीवर किंवा शिक्षकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवता येणार आहे. 

न्यायालयाने पुढे म्हटलं आहे की, कमकुवत किंवा दुर्बल मनाच्या व्यक्तीने घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल इतर कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही. न्यायालयाने 24 वर्षांची तरुणी आणि तिच्या दोन भावांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रद्द करत त्यांची निर्दोष सुटका केली आहे. 

Read More