Marathi News> भारत
Advertisement

1 लिटर पेट्रोल आणि 2 लिंबू फ्री, दुकानदाराची अनोखी शक्कल

त्याच्या या अनोख्या ऑफरमुळे तो सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

1 लिटर पेट्रोल आणि 2 लिंबू फ्री, दुकानदाराची अनोखी शक्कल

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलचे भावा वाढतच चालले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री बसत आहे. पेट्रोलचे दर शंभरी पार केल्यानंतर अनेकांनी आपल्या गाड्य़ा चालवणं बंद केलं आहे. तर अनेक लोक अजूनही कसं बसं ऍडजेस्ट करुन आपल्या गाडीत पेट्रोल भरत आहेत. पट्रोलच्या या वाढत्या दरासोबतच लिंबूचे दर देखील गगनाला भिडले आहे. हे पाहता एका मोबाईल दुकानदाराने अनोखी ऑफर आणली आहे. ज्यामध्ये तो आपल्या ग्राहकांना 1 लिटर पेट्रोल आणि दोन लिंबू फ्री देत आहेत.

त्याच्या या अनोख्या ऑफरमुळे तो सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

आता याची नक्की काय ऑफर आहे हे जाणून घेऊ या

ही ऑफर वाराणसीतील एका दुकानदाराने ठेवली आहे. दुकानदाराचे म्हणणे आहे की, जर कोणी त्याच्या दुकानातून किमान 100 रुपये किमतीचा मोबाईल घेतला, तर त्याला 2 लिंबू मोफत दिले जातील. मोबाईल शॉपी मालकाच्या या ऑफरची चर्चा जोरात सुरू आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना देखील ही ऑफर फार आवडली आहे. ज्यामुळे अनेक ग्राहकांनी देखील तेथे गर्दी केली आहे.

Read More