Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: भर कार्यक्रमात पठ्ठ्यानं लगावले जबरदस्त ठुमके, डान्स पाहून बायका पोरी लाजल्या!

Funny uncle dance video: इन्टाग्रामवर बसंत फैजाबादी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ 23 जुन रोजी शेअर करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Viral Video: भर कार्यक्रमात पठ्ठ्यानं लगावले जबरदस्त ठुमके, डान्स पाहून बायका पोरी लाजल्या!

Uncle Dance Viral Video: येत्या काही महिन्यात लग्नाचा सिझन सुरू होणार आहे. लग्नातील किंवा घरगुती कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असतात. सोशल मीडियामुळे अनेकाच्या प्रायव्हसीचा भंग झालाय, असा आरोप करण्यात येतो. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दररोज अपलोड होत असतात. त्यातील काही व्हिडिओ (Shocking Video) अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही तर काही व्हिडिओ (Funny Video) पोट धरून हसवतात. अशातच एका अंकलचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 

निळा शर्ट पॅट घातलेल्या या व्यक्तीने भर कार्यक्रमात आग लावली. सारे लड़कों की या गाण्यावर व्यक्तीने भन्नाट डान्स केला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सर्वांच्या नजरा त्यावेळी फक्त आणि फक्त या व्यक्तीकडेच खिळल्याचं दिसून आलंय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, हा डान्स पाहून अनेकजण मजा घेत असल्याचं दिसत आहे. सध्या इन्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा - सेकंदात कारने बदललं रुपडं, Transformer Car पाहिलीत का? आनंद महिंद्राही झाले थक्क; पाहा Video

इन्टाग्रामवर बसंत फैजाबादी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ 23 जुन रोजी शेअर करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 2.4 लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. तर अनेकांनी या व्हिडीओ भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 1990 साली आलेल्या दिवाना मुझ सा नहीं या चित्रपटातील सारे लडको की या गाण्यावर या व्यक्तीने डान्स केलाय.

पाहा Video

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Basant (@basantfaizabadi)

दरम्यान, नुकत्याच आलेल्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमामध्ये पुरूषाच्या नृत्य कलावर भाष्य करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना या सिनेमाची आठवण आली आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओवर अनेकांनी अशा कमेंट्सचा पाऊस पडल्याचं पहायला मिळत आहे.

Read More