Marathi News> भारत
Advertisement

Delhi Airport : धक्कादायक घटना! उड्डाण करणाऱ्या विमानाला अचानक लागली आग अन्...

Delhi Airport : दिल्ली-बेंगलोर इंडिगो फ्लाइट (6E-2131) दिल्ली विमानतळावर आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्पार्कची माहिती मिळताच विमानतळावर 'संपूर्ण आणीबाणी' घोषित करण्यात आली.

Delhi Airport : धक्कादायक घटना! उड्डाण करणाऱ्या विमानाला अचानक लागली आग अन्...

Full emergency at Delhi airport : भारतातील प्रसिद्ध असलेल्या विमान दिल्ली विमानतळावर धक्कादायक घटना घडली आहे. संशयास्पद ठिणगी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर (Delhi airport) रोखण्यात आलंय. दिल्लीहून बेंगळुरूला जाणारे इंडिगोचे फ्लाइट (6E-2131) संशयास्पद ठिणगीमुळे दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आलं. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे.

प्रवाशांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, (Bengaluru bound IndiGo flight) विमान उड्डाणाच्या तयारीत असताना, त्यातून भीषण आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. स्पार्कची माहिती मिळताच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. मात्र, सुदैवाने विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच हा अपघात झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

आणखी वाचा - Fire Cut : फायर हेअरकट करताना तरुण होरपळला, व्हीडिओ व्हायरल

स्पाइसजेट आणि इंडिगो सारख्या विमान कंपन्यांच्या विमानांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं मागील काही महिन्यात पहायला मिळतंय. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत होते. त्यानंतर आता दिल्ली विमानतळावर देखील मोठी घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ- 

भारताच्या एव्हिएशन रेग्युलेटरकडूनही अनेक विमानांची तपासणी केली जात आहे. या वर्षी जुलैमध्ये, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्पाइसजेटकडून त्यांच्या विमानांबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं आणि विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्न उपस्थित केले होते.

Read More