Marathi News> भारत
Advertisement

Corona virus: दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत...; कोणत्या भागात कोरोनाचे किती रूग्ण, पाहा आकडेवारी!

Corona virus: कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तणाव वाढला आहे. आतापर्यंत देशात कोरोना विषाणू 'JN.1' या नवीन प्रकाराची 69 प्रकरणं आढळून आली असून त्यापैकी 34 प्रकरणे गोव्यात आढळून आली आहेत. 

Corona virus: दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत...; कोणत्या भागात कोरोनाचे किती रूग्ण, पाहा आकडेवारी!

Corona virus: देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता वाढू लागली आहे. केरळमध्ये दर दिवशी रूग्णसंख्या वाढलेली पहायला मिळतेय. कोरोनाचा नवा सब-व्हेरिएंट JN.1 मोठ्या प्रमाणात पसरतोय. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या व्हेरिएंटला जास्त घाबरण्याची गरज नाही. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसचा सब व्हेरिएंट 'JN.1' ची 69 प्रकरणं आढळून आली आहेत. 

JN.1 च्या 69 नव्या प्रकरणांची नोंद

कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तणाव वाढला आहे. आतापर्यंत देशात कोरोना विषाणू 'JN.1' या नवीन प्रकाराची 69 प्रकरणं आढळून आली असून त्यापैकी 34 प्रकरणे गोव्यात आढळून आली आहेत. तर बंगळुरूमध्ये 70 टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. 

आतापर्यंत देशात कोरोना विषाणू 'JN.1' या नवीन प्रकाराची 69 प्रकरणे समोर आली आहेत. नवीन वर्षाच्या तोंडावरच गोव्यात JN.1 चे सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. या ठिकाणी 34 रुग्णांना लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात नऊ, कर्नाटकातील आठ, केरळमधील सहा, तामिळनाडूतील चार आणि तेलंगणातील दोन प्रकरणांची नोदं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये असून रुग्णालयात दाखल होण्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांच्या सांगण्यानुसार, आम्ही पूर्णपणे तयार आहोत आहोत. मात्र सध्या काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आम्ही लोकांना खबरदारी घेण्यास आणि मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत देशभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 412 नवीन प्रकरणं समोर आली. या कालावधीत 24 तासांत 3 रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी सोमवारी 24 तासांत 628 तर रविवारी 656 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4.44 कोटी रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची माहिती आहे. तर 5.33 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर कोरोनाने विळखा घातलेल्या लोकांची संख्या 4.5 कोटींवर पोहोचली आहे. 

कोरोनाच्या JN.1 ची कोणती लक्षणं दिसून येतात? 

जेएन.1 ची बहुतेक प्रकरणं अतिशय सौम्य असल्याचं सांगण्यात येतंय. ताप, खोकला, नाक वाहणं, घसा खवखवणं, अंगदुखी आणि थकवा इ. ही लक्षणे फ्लूसारख्या इतर श्वसनाच्या आजारांपेक्षा वेगळी नाहीत. या लक्षणांसह श्वासोच्छवासाची समस्या असल्यास काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Read More