Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक अहवाल; भारतातही आईचे दूध अशुध्द!

जगभरात जमीन प्रदुषणामुळे सुरक्षा आणि मानवी जीवीताला धोका निर्माण केला आहे. येत्या काळात निर्माण होणारे हे एक मोठे आव्हान असणार आहे,

धक्कादायक अहवाल; भारतातही आईचे दूध अशुध्द!

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) ने जाहीर केलेल्या एका अहवालात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अहवालात म्हणले आहे की, युरोप आणि दक्षिण अफ्रिकेलीत काही देशांसोबतच आता भारतातील महिलांचे (आई) दूधही अशुद्ध झाले आहे. या महिलंच्या दूधामध्ये हानिकारक केमिकल आढळून आली आहेत. काही ठिकाणी तर, हे केमिकल मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे.

आईचे दूधातही रसायने

एफएओने केलेल्या दाव्यानुसार आईच्या दूधात बाळाच्या जीवाला हानीकारक ठरू शकतील अशी रसायने तयार व्हायला शेतात वापरली जाणारी खते आणि कीटकनाशकं कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. एएफओने हा अहवाल रोम येथे बुधवारी जाहीर केला. या अहवालात जगभरात जमीन प्रदुषणामुळे सुरक्षा आणि मानवी जीवीताला धोका निर्माण केला आहे. येत्या काळात निर्माण होणारे हे एक मोठे आव्हान असणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

माती प्रदुषण हे भविष्यातील मोठे आव्हान

एफएओने पुढे म्हटले आहे की, माती प्रदुषणामुळे निर्माण होणारी समस्या गंभीर आहे. पण, अद्याप त्यावर व्यापकपणे संशोधन केले गेले नाही. बकाल होणारी खेडी, वढते शहरीकरण, शेतीमध्ये वापरली जाणारी अतिरासायनीक खते, कीटकनाशकं शहरी कचरा या सर्वाचा परीणाम जमीनीवर होत आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात मातीचे प्रदुषण होत आहे. माती प्रदुषणामुळे हवा आणि पाण्याचेही प्रदुषण वाढण्याचा धोका आहे.

Read More