Marathi News> भारत
Advertisement

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची सुनावणी पूर्ण

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची सुनावणी पूर्ण

मुंबई : चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवर उद्या दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. सर्व आरोपींनंतर लालूंना शिक्षा सुनावली जाईल. शनिवारी 6 आरोपींचा फैसला होणार आहे. लालू प्रसाद यादव सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लालूंची सुनावणी झाली. वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे कमी शिक्षा सुनावली जावी, असा अर्ज लालू यांच्या वतीनं वकीलांनी विशेष सीबीआय कोर्टात दाखल केला. देवघर तिजोरीमधून 90 लाख रुपये काढल्याप्रकरणी लालूंसह 15 जणांना रांचीतील विशेष सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलं होतं. 

लालू प्रसाद यादव सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे कमी शिक्षा सुनावली जावी, असा अर्ज लालू यांच्या वतीनं वकीलांनी विशेष सीबीआय कोर्टात दाखल केला. वय आणि प्रकृती ठिक नसल्यानं कमीत कमी शिक्षा सुनावली जावी, असं लालूंनी अर्जात नमूद केलंय. दरम्यान, तुरुंगात आपल्याला थंडी वाजत असल्याची तक्रार लालूंनी न्यायालयाकडं केली. त्यावर तबला किंवा हार्मोनिअम शिकण्याचा सल्ला न्यायाधीशांनी दिला. आपलं मन कशात तरी गुंतवून ठेवण्याचा सल्ला देत थंडीचा मुद्दा न्यायालयानं निकाली काढला.

देवघर तिजोरीमधून 90 लाख रुपये काढल्याप्रकरणी लालूंसह 15 जणांना रांचीतील विशेष सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलं होतं. कालपासून शिक्षेवरच्या युक्तीवादाला सुरुवात झालीय. त्यामुळं लालूप्रसाद यादवांना काय शिक्षा मिळते, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Read More