Marathi News> भारत
Advertisement

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, सहा जण जखमी

हे कुटुंब कानपुरच्या नौबस्तायेथील नागरीक आहेत. हे संपूर्ण कुटुंब राजस्थान मधील बालाजी मंदीरीत गेले होते.

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, सहा जण जखमी

नवी दिल्ली : आग्रा येथील शाहगंज पोलीस स्टेशन समोर एक भीषण अपघात झला आहे. अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण मृत्यूमुखी पडले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात एक पुरुष, तीन महिलांचा समावेश असून एक लहान मुलगा मृत्यू  झाला आहे. पोलिसांनी जखमींना जवळच्या एस एन मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. जखमींवर रुगणालयात उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती अजुनही गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब कानपुरच्या नौबस्तायेथील नागरीक आहेत. हे संपूर्ण कुटुंब राजस्थान मधील बालाजी मंदीरीत गेले होते. दर्शन घेवून परतत असताना हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले. वाहन चालकाला झोप आल्यामुळे त्याचे गाडीवरचे नियंत्रण सूटले आणि स्कॉर्पियो गाडीने समोर असलेल्या झडाला जोरदार टक्कर दिली. भीषण अपघातची माहिती जखमींनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घडलेल्या अपघाताची माहिती तात्काळ त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या ६ जखमींवर उपचार सुरू असून मृत्यूमुखी पडलेल्या ५ जणांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे. १३ जानेवारीला याचठिकाणी झालेल्या अपघातात २ जण मृत्यूमुखी पडले होते.

Read More