Marathi News> भारत
Advertisement

भारतात 'आफ्रिकन स्वाईन फ्लू'चं पहिलं प्रकरण, अडीच हजार डुकरांचा मृत्यू

आसाम सरकारने रविवारी म्हटलंय, राज्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूची पहिली केस समोर आली आहे. 

  भारतात 'आफ्रिकन स्वाईन फ्लू'चं पहिलं प्रकरण, अडीच हजार डुकरांचा मृत्यू

गुवाहाटी : आसाम सरकारने रविवारी म्हटलंय, राज्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूची पहिली केस समोर आली आहे. यामुळे राज्यातील ३०६ गावांमधील २ हजार ५०० पेक्षा जास्त डुकरांचा मृत्यू झाला आहे. हा घातक आजार थांबवण्यासाठी केंद्राकडून राज्याला तात्काळ डुकरांना मारण्याची परवानगी आहे, तरी देखील अन्य काही मार्गाने हा आजार थांबवता येईल का, यावर पर्याय शोधणे सुरू असल्याचं राज्याचे पशुपालन तसेच पशु आरोग्य मंत्री अतुल बोरा यांनी म्हटलं आहे.

मंत्री अतुल बोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था (एनआयएचएसएडी) भोपाळ यांनी याबाबतीत स्पष्ट केलं आहे की, हा आफ्रिकन स्वाईन फ्लू आहे.(एएसएफ). तसेच केंद्राने देखील माहिती दिली आहे की, हे देशातील पहिलं प्रकरण आहे.

तसेच त्यांनी स्पष्ट केलं आहे की, देशातील साथ COVID-19 शी याचं काहीही देणं घेणं नाही. संबंधित विभागाकडून २०१९ च्या गणेनुसार आसाम राज्यात डुकरांची संख्या २१ लाख एवढी आहे, आता ती वाढून ३० लाखांपर्यंत आली आहे.

Read More