Marathi News> भारत
Advertisement

उत्तर भारतात दोन कंपन्यांत भीषण आग, गोंधळ होऊन कामगार सैरावैरा

 चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग तर दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत प्लास्टिक कंपनीलाआग लागली.

उत्तर भारतात दोन कंपन्यांत भीषण आग, गोंधळ होऊन कामगार सैरावैरा

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. अकरपूर स्थित अॅग्रो टेक कंपनीत चिप्स आणि पापड बनवण्याचे तसंच पॅकिंगचे काम होतं. या कंपनीत पॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यावेळी सकाळी नऊच्या सुमारास अचानक ही आग लागली. आगीनंतर कंपनीत एकच गोंधळ निर्माण झाला आणि कामगार सैरावैरा पळू लागले. 

क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केलं आणि तिथे असलेला ट्रकही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला असता तर तिथे असलेल्या ८० गॅस सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मोठा अनर्थ झाला असता. 

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत प्लास्टिक कंपनीलाआग लागली. नोएडा इथल्या प्लास्टिक कंपनीत सकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. आगीनंतर इथं काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. 

Read More