Marathi News> भारत
Advertisement

सूरत: कपडा मार्केटला भीषण आग, अग्निशमनदलाच्या ४० गाड्या घटनास्थळी

 रघुवीर टेक्सटाइल मार्केटमध्ये भीषण आग 

सूरत: कपडा मार्केटला भीषण आग, अग्निशमनदलाच्या ४० गाड्या घटनास्थळी

सूरत : गुजरातच्या सूरतमधील रघुवीर टेक्सटाइल मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. घटनास्थळी ५० अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण आग इतकी भयंकर आहे की, मोठ्या प्रमाणात धुर झाला आहे.

सारोली भागात असलेल्या या कापडच्या १० मजली मार्केटमध्ये आग लागली आहे. आगीच कारण अजून समोर आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच नवव्या मजल्यावर ही आग लागली होती.

अग्निशमनदलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तरी कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

Read More