Marathi News> भारत
Advertisement

प्रेम कहानीचा भयानक The End...! चिठ्ठीत लिहिलेली शेवटची इच्छा ऐकून हादरा बसेल

अधुरी प्रेम कहानी, हातात हात घेऊन दोघांनी संपवलं जीवन, शेवटची इच्छा होईल का पूर्ण?  

प्रेम कहानीचा भयानक The End...! चिठ्ठीत लिहिलेली शेवटची इच्छा ऐकून हादरा बसेल

Crime News : प्रेमाच्या अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. प्रत्येक लव स्टोरीमध्ये काहीतरी नवीन असतं. मात्र काही स्टोरी इतक्या भयानक असतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. असच एक प्रकरण समोर आलं असून यामध्ये एका प्रेमी युगलाने एकत्र फाशी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामधील मृत मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.  

नेमकं काय आहे प्रकरण?
दोघांच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांच्या विरोध होता. शेवटी दोघांनी टोकाचा निर्णय घेतला आणि हातात हात घेत एकत्र फाशी घेतली. यावेळी दोघांनी सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये, आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. दोघेही हे पाऊल स्वत:च्या इच्छेने उचलत असल्याचं लिहिलं होतं. त्यासोबतच दोघांना एकाच चितेवर अग्नी देण्याची इच्छा त्यांनी चिठ्ठीमध्ये व्यक्त केली होती.

माझा मुलगा रोजप्रमाणे घरात एकटा पडून होता. अचानक रात्री 3 वाजता तो उठून गेला होता. सकाळ होताच संबंधित मुलीच्या घरातील एक व्यक्ती आला. मला त्यांच्या मुलीबाबत विचारू लागल्याचं मुलाच्या वडिलांनी सांगितलं. काही वेळाने दोघांनीही फाशी घेतल्याचं त्यांना समजलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

पोलिसांनी दोन्ही कुटुंबाची चौकशी केली. दोघांच्याही घरच्यांचा या विवाहाला विरोध होता आणि मुलगी ही अल्पवयीन असल्याने घरचे मंजुरी देत नव्हते. सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातील बिधुना पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.

Read More